अजित पवारांनी काढलेल्या चिठ्ठीत निघालं ‘आदित्य’ नाव, CM एकनाथ शिंदे म्हणाले…
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघिणीच्या तीन बछड्यांना नाव देण्यात आली. यावेळी अजित पवारांनी काढलेल्या एका चिठ्ठीत आदित्य हे नाव निघालं होतं.
ADVERTISEMENT

– इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर
Ajit Pawar Eknath Shinde Aaditya Thackeray : छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघिणीच्या तीन बछड्यांचं बारसं झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पण, हा कार्यक्रम चर्चेत आला तो आदित्य नावामुळे! अजित पवारांनी काढलेल्या एका चिठ्ठीत निघालेल्या आदित्य नावामुळे राजकीय वैराची प्रचिती बघायला मिळाली. किस्सा नेमका काय, तेच वाचा…
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने सरकारचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्काम झाला. मंत्रिमंडळ बैठकीसह अनेक कार्यक्रम पार पडले. यात एक कार्यक्रम झाला वाघिणीला झालेल्या तीन बछड्यांच्या बारसाचा. बछड्यांची चिठ्ठ्या काढून नाव ठेवण्यात आली.
अजित पवारांनी चिठ्ठी काढल्यानंतर काय घडलं?
वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. यात एक मादी आणि दोन नर आहेत. यासाठी काही नावांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिठ्ठी काढली. या चिठ्ठीत आदित्य नाव होतं. अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवारांना चिठ्ठीतील नाव दाखवलं आणि सांगितलं की, ‘आदित्य आहे… आदित्य’.










