Advay Ahire : ठाकरे गटाच्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

advay hire detained by nashik police from bhopal thackeray group leader
advay hire detained by nashik police from bhopal thackeray group leader
social share
google news

प्रविण ठाकरे, मालेगाव,

Advay Hire Arrested from Bhopal : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गटाला (Thackeray Group)-मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना नाशिक पोलिसांनी (Nashik Police) ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिसांनी भोपाळमध्ये (Bhopal) जाऊन ही कारवाई केली आहे. त्यामुळे अद्वय हिरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एनडीसीसी बँक आणि शिक्षण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (advay hire detained by nashik police from bhopal thackeray group leader)

अद्वय हिरे यांनी मालेगाव येथील रेणुका सूतगिरणीसाठी नाशिक जिल्हा बँकेककडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने थकीत कर्ज व व्याज असा एकत्र आकडा 30 कोटीच्या घरात पोहचला होता. या प्रकरणात त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे याप्रकरणी रमजान पुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nana Patekar : चाहत्याच्या डोक्यात मारली जोरात चापट; समोर आलं खरं कारण

दरम्यान रेणुका सूतगिरणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे हिरे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा जामीन नुकताच फेटाळण्यात आला होता. त्यामुळे नाशिक पोलीस त्यांच्या मागावर होती. नाशिक पोलिसांना अद्वय हिरे भोपाळमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांनी भोपाळ गाठत अद्वय हिरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आता नाशिक किंवा मालेगावमध्ये आणले जाईल. त्यानंतर उद्या गुरुवारी त्यांना कोर्टात हजर केले जाण्याचीही शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा : Abdul Razzaq Aishwarya Rai: ‘ऐश्वर्यासोबत लग्न करू आणि मुलंही…’, रझाकने काय बरळला?

दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध रंगलेलं होतं.विशेष म्हणजे खासदार संजय राऊत विरूद्ध असे चित्र असताना, मालेगावचे अद्वय हिरे यांनी देखील दादा भूसे यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं होतं.त्यानंतर अद्वय हिरे आणि त्यांच्या परिवारावर सूडबुद्धिने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT