तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर, म्हणाले…
Jayant Patil outside ED office after 9 hours of interrogation:इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तब्बल 9 तास चौकशीला सामोरे गेल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

IL and FS case,Jayant Patil outside ED office after 9 hours of interrogation: इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबईतील कार्यालयात आज तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर नुकतेच जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर आले आहेत. ईडी कार्यालयाबाहेर प़डताच त्या्ंनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयातील संपूर्ण चौकशी मागचा तपशील सांगितला आहे. (after 9 hours of interrogation in ed office ncp jayant patil share reaction)
तब्बल 9 तास चौकशीला सामोरे गेल्यानंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी कधीच केलेल्या नाहीत. म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने ईडीच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. माझ्या उत्तराने त्यांचे संपूर्ण समाधान झाले आहे.तसेच मला वाटत नाही त्यांच्याकडे आता काही प्रश्न शिल्लक असतील,असे देखील जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत. तसेच आपण शरद पवारांचे (Sharad pawar) सैनिक आहोत, असेच लढायचं आहे, असा आत्मविश्वास देखील त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.
हे ही वाचा : ‘लहरी माणूस, दोन चमत्कार…’, PM मोदींवर शरद पवारांची पुणेरी टोलेबाजी
तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लांबचा प्रवास करून इथे आलात आहात. सकाळपासून या ठिकाणी वेळ घालवला आहात. आता आपण सगळ्यांनी शांततते घरी जायला हरकत नाही. शांततेत जा, गडबडीत जाऊ नका, हवं तर सकाळी जा, असा सल्ला देखील जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच सर्वांचे मनपुर्वक आभार, मला जे समर्थन दिलंत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. भविष्यात असाच पाठींबा,अशीच ताकद मिळेल अशी अपेक्षा करतो,असे देखील जयंत पाटील (Jayant Patil)म्हणाले आहेत.