‘भांग घेतल्यावर माणूस डुलायला लागतो..’, सदाभाऊ खोतांनी मंत्री शंभूराज देसाईंना डिवचलं!

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

after consuming hemp a person begins to sway sadabhau khot criticizes minister shambhuraj desai
after consuming hemp a person begins to sway sadabhau khot criticizes minister shambhuraj desai
social share
google news

Sadabhau Khot Vs Shambhuraj Desai: सातारा: राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्ता भांग प्यायल्यासारखी अंगात आली की, माणूस डुलायला आणि नाचायला लागतो. अशा जहरी शब्दात सदाभाऊ खोत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. ज्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. कारण सदाभाऊ खोत हे भाजपचे (BJP) समर्थक आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) निकटवर्तीय समजले जातात. अशावेळी त्यांनी अशा प्रकारची टीका केल्यानं सत्तेत असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत धुसफूस असल्याचं समोर येत आहे. (after consuming hemp a person begins to sway sadabhau khot criticizes minister shambhuraj desai)

सदाभाऊ खोत यांनी नेमकी काय टीका केली

शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला मात्र, पालकमंत्री यांनी साधा एक‌ फोन केला नाही. ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही, ना एक रुग्णवाहिका दिली.. अशी स्पष्ट नाराजी सदाभाऊ खोत यांनी भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यासमोर बोलून दाखवली.

हे ही वाचा >> शरद पवारांबद्दलच्या ‘त्या’ ट्विट्सनी अरविंद केजरीवालांचा ‘गेम’ केला!

सदाभाऊ खोत पुढे असंही म्हणाले की, ‘सत्ता ही भांग पिल्यासारखी अंगात आली की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो. मात्र, नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल.’ अशी जहरी टीका शंभुराज देसाई यांच नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शंभूराज देसाई यांचा पलटवार

सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका करताच मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील त्यांच्यावर पलटवार केला आहे.’सदाभाऊ खोत हेच भांग पीत असतील यामुळेच त्यांनी नशेत असं वक्तव्य केलं असेल.’ असं म्हणत शंभूराज देसाई यांनी खोतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा >> सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप, सेल्फी घ्यायला गेला.. नंतर साहेबांनी अख्खा तलावच उपसला!

यावेळी शंभुराज देसाई म्हणाले की, ‘सदाभाऊच भांग पित असतील यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केलंय.’ असा टोला शंभुराज देसाई यांनी लागवला. यावेळी ते असंही म्हणाले की, ‘आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती, सर्व प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले होते.’

ADVERTISEMENT

दरम्यान, या निमित्ताने सध्या सातारा जिल्ह्यात सदाभाऊ खोत विरुद्ध शंभूराज देसाई असं चित्र पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT