NCP: जयंत पाटील म्हणतात मला बैठकीचं निमंत्रण नाही, तर तटकरे म्हणाले ‘अहो…’
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीच आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच जयंत पाटील हे देखील नाराज असल्याचंही समजतं आहे.
ADVERTISEMENT
मुबंई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षात सारं काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी लावून धरली आहे. ही मागणी करताना त्यांना आपलं रडूही आवरलं नव्हतं. तर दुसरीकडे अजित पवारांना शरद पवारांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं वाटतं. या सगळ्यात पक्षात दुफळी असल्याचं आता समोर आलं. त्यातच आज (3 मे) जयंत पाटील यांनी थेट असंही म्हटलं की, आज मुंबईतील बैठकीसाठी त्यांना बोलविण्यात आलं नाही. आता या सगळ्या घडामोडींमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काहीच आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. (after the resignation of sharad pawar there is a drama of anger in the ncp jayant patil is not really invited to meeting)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीत नेमकं काय सुरुय?
शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत एकच खळबळ माजली. काल पासून अनेक नेते हे शरद पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देखील राष्ट्रवादीचे अनेक नेते हे वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान येथे जमले होते. जिथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाल्याचं देखील बोलण्यात येत आहे. पण या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं सांगण्यात आलं. ‘आज बैठक आहे हे मला माहिती नव्हतं. मला याची कोणीही कल्पना दिली नव्हती.’ त्यांच्या याच वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
‘मला बैठकीबद्दल कोणीही कल्पना दिली नव्हती’
‘पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा असं सगळ्यांना वाटतं आहे. मला अनेकांनी फोन केले. सुप्रिया सुळे यांच्या नावाची काय चर्चा झाली ते मला माहित नाही. माझ्यासमोर तरी काही अशी चर्चा झालेली नाही. मला काहीच कल्पना नाही याची. मी काही राष्ट्रीय पातळीवरचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आपल्या पक्षात कोणती तरतूद आहे हे मला काही माहीत नाही.’
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Sharad Pawar: राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, जितेंद्र आव्हाडांनीही दिला राजीनामा!
‘आज बैठक आहे हे मला माहिती नव्हतं. मला याची कोणीही कल्पना दिली नव्हती. माझी पुण्यात ठरलेली बैठक आहे. या बैठकीसाठी मी सकाळी पुण्यात आलो. ही बैठक झाल्यानंतर मी परत जाणार आहे.’ असं जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, यावेळी जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.
‘कोणतीही बैठकच बोलवली नव्हती…’
मात्र, जयंत पाटील यांनी जे विधान केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी आता खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, ‘शरद पवार यांनी विचार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. अहो आज कोणतीही बैठकच बोलावली नव्हती. ज्या वेळेला बैठक बोलविण्यात येईल तेव्हा मीडियाला कळविण्यात येईल.’ असं तटकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
याचबाबत छगन भुजबळ यांनी देखील मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, ‘आज बैठक वैगरे काही बोलविण्यात आलेली नाही. त्यामुळे गैरसमज नको. जयंत पाटील कामानिमित्त मुंबईच्या बाहेर आहेत. आम्ही मुंबईत आहोत.. तसेच राज्य आणि देशातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे इथे आले आहेत. कारण साहेबांनी त्यांचा निर्णय थांबवावा, मागे घ्यावा. अशी विनंती करण्यासाठी आले आहेत. ते सगळे नेते साहेबांना भेटत आहेत.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Sharad Pawar : महाराष्ट्रात झाला, आता दुसरा राजकीय भूकंप कोणता?
‘एक-दोन दिवसात एक बैठक होईल. तोपर्यंत साहेबांचं मन वळविण्याचा प्रयत्न होईल. जयंत पाटील हे आज बैठकीत नाही. आणखीही काही जणं नाहीत. ते सगळे जणं त्यावेळेला मीटिंगमध्ये राहतील. जयंत पाटील हे संध्याकाळीच येणार आहेत मुंबईत. आम्ही मुंबईत आहोत.. घरी बसून काय करणार ना.. त्यामुळेच इथे येऊन आम्ही पवार साहेबांचं मन वळविण्याचा प्रयत्न करत आहोत.’
शरद पवारांनी थेट जयंत पाटलांना केला फोन?
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पाटील हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत पोहचणार आहेत. मात्र, याआधी अशी चर्चा होती की, आज वाय. बी. चव्हाण येथे एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या बैठकीचं निमंत्रण जयतं पाटील यांना नव्हतं. अखेर शरद पवार यांनीच या बैठकीतून जयंत पाटील यांना फोन केला. त्यानंतर जयंत पाटील हे मुंबईसाठी रवाना झाले.
हे ही वाचा >> राष्ट्रवादीच्या बैठकीचं आमंत्रण नव्हतं? जयंत पाटलांनी चर्चाच थांबवली
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून यावेळी अशीही माहिती मिळाली की, सर्व नेत्यांनी शरद पवार यांना आग्रह केला की त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहावं. अनेकांनी शरद पवार यांना असंही सांगितलं की, किमान त्यांची राज्यसभेची टर्म संपेपर्यंत तरी त्यांनी पक्षाचं अध्यक्ष म्हणून कायम राहावं.
आता या सगळ्याबाबत शरद पवार हे नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT