Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!
महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडीने अनेक राजकीय संदेश दिले आहेत. अजित पवार महाराष्ट्रातील सरकारमध्ये सामील झाले म्हणजे एकनाथ शिंदे यांची भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. कारण भाजपकडे आता चांगला पर्याय म्हणून अजित पवार आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Political News in Marathi : रविवारची दुपार महाराष्ट्रासाठी राजकीय वादळ घेऊन आली. अवघ्या काही तासांतच राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी 180 अंशांचा टर्न घेत काका शरद पवार यांच्या विरोधात बंडखोरी केली. हे काही किरकोळ बंड नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील या संघर्षाने 2 जुलैला महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलून टाकले. अजित पवारांनी आधी आमदारांची बैठक घेतली आणि नंतर थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ! अजित पवार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. पण, अजित पवारांचा एनडीएतील प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी चांगली बातमी आहे आहे, असं म्हणता येणार नाही. (How Ajit Pawar’s entry in NDA can prove to be bad news for Eknath Shinde)
ADVERTISEMENT
रविवारी दुपारी अजित पवार थेट राजभवनवर पोहोचले. अजित पवार यांच्यासोबत 18 आमदार होते. आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, अशी बातमी आली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदलले.
वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांनी घेतली शपथ, शरद पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, अजित पवारांचा एनडीएतील प्रवेश हा शिंदे गटासाठी अडचणीचा ठरू शकतो. तो कसा तेच पाहुयात…
हे वाचलं का?
भाजपसमोर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर झाली कमी
महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडीने अनेक राजकीय संदेश दिले आहेत. अजित पवार महाराष्ट्रातील सरकारमध्ये सामील झाले म्हणजे एकनाथ शिंदे यांची भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. कारण भाजपकडे आता चांगला पर्याय म्हणून अजित पवार आहेत. आपल्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार भाजप एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासोबत पुढे जाऊ शकते, किंवा दोघांनाही सोबत घेऊ शकते, हे आगामी राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल. तसेच या त्रिकोणी मैत्रीची खरी अग्निपरीक्षा 2024 मध्ये जागा वाटपा दरम्यान होणार आहे.
वाचा >> Maharashtra Politics: अजित पवारांचा शपथविधी अन् आदित्य ठाकरे म्हणाले, तुमच्या गद्दारीमागे फक्त…!
एकनाथ शिंदे महाराष्ट्रात सरकारचे नेतृत्व करत असले, तरी राज्यात खरा बॉस भाजपच आहे. लोकसभेच्या 48 जागा असलेले महाराष्ट्र हे 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी महत्त्वाचे राज्य आहे. 2014 पासून भाजप या राज्यात क्लीन स्वीप करत आहे. 2019 मध्येही भाजपने येथे दणदणीत विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्येही भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेने 48 पैकी 41 जागा जिंकल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये एकट्या भाजपने 23-23 जागा जिंकल्या. भाजपला 2024 मध्येही या कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे, पण ते इतके सोपे नाही.
ADVERTISEMENT
शिंदे यांची महत्त्वाकांक्षा भाजपला आणू शकते अडचणीत
भाजपच्या या प्रयत्नात एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा आडवी येऊ शकते. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली स्वतंत्र सत्ता राबवण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांना भाजपच्या छायेतून बाहेर पडून आपली वैयक्तिक प्रतिमा विकसित करायची आहे. दीर्घकालीन राजकारणासाठी शिंदेंकडून हे केलं जात आहे.
ADVERTISEMENT
वाचा >> Ajit Pawar : “…म्हणून आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो”
शिंदे व त्यांचे नेते वेळोवेळी असे संकेत देत आले आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी 2024 मध्ये शिंदे गटासह शिवसेना 22 जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. खरे तर 2019 मध्ये अविभाजित शिवसेनेने भाजपसह 23 जागा लढवल्या होत्या. भाजप 25 जागा लढवत होता. त्याच धर्तीवर आता स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेणाऱ्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 2024 मध्ये लोकसभेच्या 22 जागा लढवायच्या आहेत.
उद्धव ठाकरेंसोबत कडू अनुभव, भाजपची आता सावध पावलं
एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा असली तरी त्यांची ही मागणी भाजप मान्य करणार का? असा प्रश्न आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंकडून मोठा झटका बसलेल्या भाजपला आता कोणत्याही किंमतीत सत्ता स्वतःच्या हातात ठेवायची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा राखल्या, तरच भाजप हे करू शकेल. जास्त जागा जिंकल्या तर भाजपचा सत्तेतील सहभाग जास्त असेल. त्यासाठी भाजपला महाराष्ट्रातील मित्रपक्षांना कमीत कमी जागा द्याव्या लागणार आहेत. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपला आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबरच अजित पवारांच्या पक्षासोबतही जागावाटप करावं लागणार आहे. आणि भाजपची हिच अडचण एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढवू शकते.
जागावाटप करताना खरी कसोटी
2024 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जागावाटप, हे खरं आव्हान असणार आहे. आता समजून घ्यायचं झालं तर समजा लोकसभा निवडणुकीत शिंदे यांना 22 जागा हव्या आहेत, पण आता भाजपला अजित पवारांसोबतही लोकसभेच्या जागा वाटून घ्याव्या लागतील. राष्ट्रवादीचे खासदारही आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. अशा स्थितीत भाजप आपल्या कोट्यातील जागा शिंदे आणि अजित पवार गटाला मिळणार नाही. म्हणजेच महाराष्ट्रात भाजपने मित्रपक्षांसाठी जागांचा जो कोटा निश्चित केलेला आहे, त्यातच काही जागा शिंदे गटाला आणि काही जागा अजित पवार गटाच्या नेत्यांना दिला जाईल, अशीच स्थिती सध्या आहे. या समीकरणामुळे एकनाथ शिंदे यांना 22 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. अजित पवार यांनी विरोधी कोट्यातील निम्म्या जागांवर दावा केला, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लोकसभेच्या 10 किंवा 11 जागा लढवाव्या लागतील. हा फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद कमी करणार असाच आहे.
शिंदे यांना विधानसभा निवडणुकीचीही करावी लागणार तयारी
हे केवळ लोकसभा निवडणुकीपुरतेच नाही. महाराष्ट्रात ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून स्थान देण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच शिंदे गटाच्या नेत्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात एका सर्वेक्षणाचा हवाला देत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचं म्हटलं होतं. स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार समजणारे महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी यामुळे अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली होती.
लोकसभा निवडणुकीत आता बघितलेल्या फॉर्म्युल्यावर भाजपने मित्रपक्षांचे समाधान केले, तर विधानसभा निवडणुकीतही कमी-अधिक प्रमाणात याच सूत्राची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर पुन्हा एकदा संकट येऊ शकते. भाजपने शिंदे यांना कमी जागा दिल्यास मुख्यमंत्री होण्याची आस असलेल्यांच्या पदरी निराश येऊ शकते. यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या विश्वासू नेत्यांच्या बंडखोरीचाही सामना करावा लागू शकतो.
वाचा >> Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत बघितल्यास भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात तुलना करून फायदे आणि तोटे निश्चितपणे तोलून कोण फायद्याचं याचा विचार करेल. कमी जागा दिल्यास एकनाथ शिंदे नाराज झाले, तर भाजपकडे आता अजित पवारांसारखा मोठा पर्याय असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT