Ajit Pawar: अजितदादा अस्वस्थ... अधिवेशन सोडून तडकाफडकी गेले दिल्लीला, घडलं तरी काय?
अजित पवार यांना हवी असलेली खाती राज्यातील भाजप नेतृत्व सोडण्यास तयार नसल्याने अजित पवार हे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवारांच्या दिल्ली वारीचं नेमकं कारण काय?

अधिवेशन सोडून अजित पवार का गेले दिल्लीला?

कोणत्या खात्यांसाठी अजित पवार आहेत आग्रही?
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीतील अनेक नेते हे नाराज आणि अस्वस्थ असल्याचं समोर आलं. त्याचं कारण म्हणजे त्यांची मंत्रिपदाची हुकलेली संधी. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच स्वत: अस्वस्थ असल्याचं आता समोर आलं आहे. कारण मागील 24 तासांपासून ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. एवढंच नव्हे तर कुणालाही फारशी कल्पना न देता अजितदादा नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून ते अचानक दिल्लीला रवाना झाले.
'यासाठी' अजित पवार अस्वस्थ?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार कालपासूनच दिल्लीत आहेत. ते कालपासून कोणालाच भेटले नव्हते. सुरुवातीला ते आपल्या बंगल्यातच आहेत अशी माहिती देण्यात येत होती. पण ते कालपासून राजधानी दिल्लीतच आहेत. अशी माहिती आता समोर आली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनला कालपासून सुरूवात झाली आहे. मात्र, अधिवेशन सोडून अजितदादा हे तडकाफडकी दिल्लीला का गेले? याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा>>Maharashtra News Live: परभणी घटनेचे पडसाद, सोलापूर आगारातील शिवशाही बस अज्ञातांनी पेटवली!
खातेवाटपाचा तिढा हा कायम आहे. त्यामुळेच त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी अजितदादा हे दिल्लीत गेले असल्याचं आता बोललं जात आहे. महिला आणि बालविकास तसंच अर्थ खात्याबाबतचा पेच हा कायम आहे. त्यामुळेच अजितदादा हे आता थेट दिल्लीला गेले आहेत.
महायुतीचा खातेवाटपाचा पेच हा कायम आहे. कालपासूनच अजित पवार हे त्यांच्या नागपूरमधील बंगल्यावर नसल्याचं समोर आल्यानंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली होती. अखेर ते दिल्लीत असल्याचं आज सकाळी समोर आलं आहे.