NCP Election Commission : ‘तो’ प्रश्न अन् अजित पवार चिडले, पुण्यात काय घडलं?
ncp news maharashtra marathi : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर शिक्कामोर्तब केले असून, लवकरच सुनावणी होणार आहे. अजित पवार यांनीही भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

Ncp split latest news : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं. अजित पवारांसह 40 आमदारांनी शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. पण, शरद पवारांकडून सातत्याने असा दावा केला गेला की पक्षात फूट पडलेली नाही. आता निवडणूक आयोगानेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील सुनावणीची तारीखही निश्चित झाली आहे. आयोगातील सुनावणीसंदर्भातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरून त्यांनी त्रागा केला.
पुण्यात अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक आयोगात बाजू मांडण्यासाठी काय तयारी केली आहे, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.
हेही वाचा >> Nagpur News : नागपूरात साजरा होणारा मारबत उत्सव आहे तरी काय?
त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “प्रत्येकजण आपापली भूमिका मांडणार. तुम्हाला काय सांगायचं की अशी तयारी केलीये. असे जोर काढलेत. अशा बैठका काढल्या. तुम्ही कसे रे प्रश्न विचारता”, असा नाराजीचा सूर अजित पवारांनी लावला.
ते पुढे म्हणाले, “त्यासंदर्भात ज्यांना बोलावलेलं आहे, ते सगळेजण आपापल्या पद्धतीने आमची बाजू कशी उजवी आहे. आमची बाजू कशी योग्य आहे. हे तिथे ते सांगतील.”