Ajit Pawar: ‘खुर्ची एक असेल तर तिथे दोघांचा डोळा ठेवून..’, CM पदावरुन अजितदादांची तुफान बॅटिंग

रोहित गोळे

ADVERTISEMENT

ajit pawar said neither i nor devendra fadnavis have an eye on the chief ministers chair chandani chowk event in pune maharashtra news politics
ajit pawar said neither i nor devendra fadnavis have an eye on the chief ministers chair chandani chowk event in pune maharashtra news politics
social share
google news

Ajit Pawar on Chief Minister Post: पुणे: पुण्यातील (Pune) चांदणी चौक (Chandani Chowk) उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा सोहळा आज (12 ऑगस्ट) पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत या पुलाचं उद्घाटन झालं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील हजर होते. ज्यांनी या सोहळ्यात भाषण करताना तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्री आणि माझ्यात कोणतंही कोल्डवॉर नाही किंवा मुख्यमंत्री पदावर (Chief Minister Post) डोळा नाही असं विधान केलं. यावेळी अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. (ajit pawar said neither i nor devendra fadnavis have an eye on the chief ministers chair chandani chowk event in pune maharashtra news politics0

ADVERTISEMENT

‘त्या एकाला वाटतंय की, या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्यांच्या अरे आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर तिथे दोघांचा डोळा ठेवून कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा.. व्यक्ती बसलेली आहे. मला खरं हे काढायचं नव्हतं.’ असं म्हणत अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमातच तुफान टोलेबाजी केली.

पाहा अजित पवार नेमकं काय-काय म्हणाले..

‘मुख्यमंत्री आणि माझ्यात अजिबात कोल्ड वॉर नाही..’

‘तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री येऊ शकले नाही. याची नोंद कृपया घ्यावी… अलिकडे काय.. रुसून गेले, फुगून गेले.. असंच झालं. आता ते काम करतायेत, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं काम चांगलं चाललं आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्रजी होतेच एका बाजूला, दुसरी बाजू मोकळी होती मी तिथे जाऊन उभं राहिलो. आता आम्ही दोघंही त्यांच्या बरोबर आहोत. चुकलं काय? विकासाच्या कामाकरिता राज्याचा सर्वांगिण विकास होत असेल जर केंद्रातून पैसा गडकरी, मोदीसाहेब देत असतील तर का घ्यायचा नाही?’

हे वाचलं का?

हे ही वाचा >> शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार का नाराज?, ‘हे’ आहे कारण!

‘परंतु दोन दिवसांच्या बातम्या बघा, अजित पवारांनी मीटिंग घेतली.. अरे तुझ्या काय पोटात दुखतंय. मीटिंग घेतली काल सह्याद्रीला.. तिथे देवेंद्रजी देखील होते. मुख्यमंत्री हे पद वेगळंच आहे. त्यांना तो सर्व अधिकार आहे. आम्ही दोघांनी बैठका घेतल्या तरी फायनल निर्णय त्यांचाच आहे. तरी देखील कोल्ड वॉर चाललं.. यांना काही उद्योग नाही. आता कुठे विरोधी पक्ष नेते झाले.. यांना कुठे कोल्ड दिसलं ना कुठलं वॉर दिसलं कोणाला माहिती..’ असं विधान अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.

‘खुर्ची एक असेल तर तिथे दोघांचा डोळा ठेवून कसं काय चालेल?’

‘त्या एकाला वाटतंय की, या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्यांच्या अरे आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर तिथे दोघांचा डोळा ठेवून कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा.. व्यक्ती बसलेली आहे. मला खरं हे काढायचं नव्हतं. पण काय होतं, आम्ही बोललो नाही की, एकच बाजू लोकांना दिसते, दुसरी बाजू दिसत नाही.’

ADVERTISEMENT

‘आज मला गडकरी साहेबांकडे एक मागणी करायची आहे.. आता ते म्हणतील, यांची एवढी कामं करून देतो तरी यांची हौस फिटत नाही. शेवटी आम्ही पुणेकर आहोत.. आता तुम्ही बसताना मला आणि देवेंद्रजींना सांगितलं की, पुणे शहराला जोडणारे जे रस्ते त्या सगळ्या रस्त्यावरील ट्रॅफिकची नीट सोय व्हावी यासाठी अनेक ठिकाणी फ्लायओव्हर अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी गडकरी साहेबांनी जवळपास 40 हजार कोटींची तयारी दाखवलेली आहे.’ असं म्हणत अजित पवारांनी आपला मुख्यमंत्री पदावर डोळा नसल्याचा दावा केला आहे.

ADVERTISEMENT

‘पुण्यात झेंडावंदन राज्यपाल करतात..’

‘आमच्या इथले काही-काही जणांना हेही माहिती नसतं की, पुण्यातील झेंडावंदन 15 तारखेला कोण करतं. पुण्याची परंपरा आहे की, 15 ऑगस्टला झेंडावंदन राज्यपाल करतात. तरी यांना खुमखुमी काय.. तर चंद्रकांतदादा करणार की, अजितदादा करणार. अरे काय घेणं-देणं आहे तुम्हाला..’

‘राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात झेंडावंदन करतात, इथलं राज्यपाल करतात आणि 26 जानेवारीचं राज्यपाल करतात शिवाजी पार्कला. अशी ती पद्धत आहे. त्यामुळे उगीच लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं काम करू नका.’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

‘असं पडलं चांदणी चौकाला नाव..’

‘खरं तर या चौकाचं नाव आपल्या महानगरपालिकेच्या दफ्तरी एनडीए चौक असं आहे. पण सुरुवातीपासून या चौकाला चांदणी चौक म्हणून ओळखलं जातं. येथील जुनी लोकं सांगतात की, जुन्या पुलावर दगडावर चांदणी कोरलेली होती. त्यामुळे चौकाला चांदणी चौक नाव पडलेलं. आता बऱ्याच दगडावर बरीच नावं कोरलेली असतात. हार्ट काढलेला असतो, बाण काढलेला असतो.. आता त्याला कोणतं नाव द्यावं?’

हे ही वाचा >> Mumbai Tak Chavadi: ‘उद्धवजींचे खेळ आणि चाळे, मीच शहाणा..’ आशिष शेलारांची जहरी टीका

‘आम्ही पुणेकर कोणालाही कोणत्याही गोष्टीला नावं ठेवायला मागे-पुढे बघत नाही. जगात आपल्या पाट्या गाजल्या आहे. पुणेकरांची पाटी.. आणि गडकरी साहेब आम्ही देवांना देखील सोडलेलं नाही. आमच्या पुण्यातील देवांचीच नावं बघा.. निवडुंग विठोबा, पासोड्या विठोबा, जिलेब्या मारुती, खुन्या मारुती, दाढीवाला दत्त, सोट्या म्हसोबा.. उपाशी विठोबा, गुडघेमोडी माता, माती गणपती, गुपचूप गणपती, गुंडाचा गणपती, बिजवर विष्णू, खुन्या मुरलीधर.. आता यापुढे आम्ही काय सांगू. म्हणजे त्यातही आम्ही मागे नाहीत.’

‘मात्र कुणालाही काहीही नावं ठेवली तरी पुणेकर कोणत्याही गोष्टीवर प्रेम देखील अगदी मनापासून करतो. सगळ्या पुणेकरांचं या चांदणी चौकावर मनापासून प्रेम आहे. आणि गडकरी साहेब आमचं तुमच्यावर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर देखील भरपूर प्रेम आहे. त्यामुळे त्या प्रेमाची उतराई आणि दोघेही नागपूरचे आहेत. तुम्ही जरा आम्हाला विलंब लावला, तुम्ही खरं आधी मेट्रो आम्हाला द्यायची होती आणि मग नागपूरला न्यायची होती. आम्ही खचाखच भरून मेट्रो चालवली असती. पण ठीक आहे देर आए दुरुस्त आये, काही हरकत नाही.’ असं म्हणत अजित पवार यांनी या कार्यक्रमात जोरदार भाषण केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT