Exclusive: अजित पवार अमोल मिटकरींना महिन्याला 50 हजार का पाठवायचे?, मुंबई Tak वर खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP MLA amol mitkari said in its interview with mumbai tak that Ajit Pawar sending 50 thousand rupees every month.
NCP MLA amol mitkari said in its interview with mumbai tak that Ajit Pawar sending 50 thousand rupees every month.
social share
google news

साहिल जोशी/अभिजीत करंडे, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड केल्यानंतर त्यांना पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना आपला पाठिंबा दिला. त्यात सर्वात पुढे होते ते राष्ट्रवादीची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे. अजित पवारांच्या शपथविधीला देखील ते हजर होते आणि त्यानंतरही ते अजित पवारांसोबतच कायम असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ते अजित पवारांसोबत का गेले, भाजपची (BJP) विचारसरणी आता त्यांना पटणार का? या सगळ्याबाबत अमोल मिटकरी यांनी मुंबई Tak ला (Mumbai Tak) दिलेल्या Exclusive मुलाखतीत सविस्तरपणे भाष्य केलं आहे. (ajit pawar sending 50 thousand rupees year during Corona i supported his decision ncp mla amol mitkari bjp govt exclusive interview mumbai tak)

याच मुलाखतीत बोलताना अमोल मिटकरी असंही म्हणाले की, अजित पवार हे त्यांना दर महिन्याला जवळजवळ 50 हजार रुपये पाठवायचे. असं खुलासा स्वत: अमोल मिटकरी यांनी केला आहे. वाचा हा नेमका किस्सा काय आहे.

‘अजित पवार मला वर्षभर 50 हजार रुपये पाठवत होते…’

‘जो कोणी पक्षातील… राष्ट्रवादी काँग्रेसमधील किती मोठा नेता असेल मग तो.. जो अजितदादांच्या विरुद्ध बोलेल त्याला त्याच तोडीस मी उत्तर देणार.. कोणीही असो तो.. ही माझी अजितदादांप्रती असलेली निष्ठा आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘जर संत साहित्याचा विषय निघाला तर तुकारामांच्या गाथेमध्ये म्हटलंय की, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.. आता तशी माझी गत झाली आहे. फार तारेवरची कसरत होईल माझी.. अधिवेशनात तर अधिकच.. अशावेळेस आम्हाला एकच धीर आहे. तो म्हणजे अजितदादा नावाचा.’

‘ज्या वेळेस शपथविधीचा हा कार्यक्रम पार पडला तेव्हा दादांना मी स्वत: शुभेच्छा द्यायला गेलो.. त्यांना म्हटलं दादा आपण घेतलेला निर्णय.. भलेही लोकं उद्या मला शिव्या घालतील.. ट्रोल करतील.. मी तर इतर भाजपविरोधात इतकं बोललोय.. म्हणजे एकवेळ कोरोनाचा व्हायरस दुरूस्त होऊ शकतो. पण भाजपचा व्हायरस दुरूस्त होऊ शकत नाही. मी एवढं बोललोय..’

ADVERTISEMENT

‘पण दादा.. तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन करतो.. कारण रामराव पाटील जे पंजाबराव देशमुखांचे मित्र होते.. त्यांनी बहीरमला एक घंटा चढवला होता. सांगितलं होतं की, भाऊसाहेब तुमच्या हातून या घंटेचं उद्घाटन झालं पाहिजे. पण पंजाबराव देशमुख हे तर नास्तिक होते. तरीही बहीरमला त्यांनी घंटा चढवला. त्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की, तुम्ही तर नास्तिक आहात.. तरीही बहीरमच्या देवाच्या समोर तुम्ही घंटा चढवली? इथे तुमचं तत्व बदललं नाही का?’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra cabinet expansion : भाजपच्या मंत्र्यांना मिळणार डच्चू? कारण…

‘त्यावर पंजाबराव म्हणाले, श्रीराम पाटील माझे बालमित्र आहेत. त्यांनी नवस बोलला होता. की, मी मंत्री झाल्यानंतर आणि त्यांना अपत्यप्राप्ती झाल्यानंतर मी या देवाला असं.. असं करणार.. त्यांनी जर गाढवाची शर्यत भरवली असती आणि त्याच्या उद्घाटनाला मला बोलावलं असतं तरी मी आलो असतो.. कारण तो श्रीराम पाटलांचा सन्मान होता. मी त्या देवाकडेही पाहिलं नाही.. मी घंटा कशी आहे तेही पाहिलं नाही. पण मी त्यांच्या सन्मानासाठी आलोय.’

‘इथे सन्मान त्या दादांचा आहे. दादा कोणासोबत गेले, कोणा बरोबर गेले.. हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. माझ्या सारख्या फाटक्या.. खरं सांगतो मी.. मी खूप सामान्य कुटुंबातील माणूस आहे. 2017 ला मी अकोला शहरामध्ये चणा-पोहे विकणारा माणूस आहे, पेपर वाटणारा माणूस आहे. तीन वर्षांपूर्वी..’

हे ही वाचा >> Crime : मुंडक कापलं, शरीराचे केले तुकडे, दृश्य बघून पोलिसांना फुटला घाम

‘ज्या वेळेस कोरोनाच काळ होता.. मी तोपर्यंत आमदार झालो नव्हतो. शिवस्वराज्य यात्रा संपल्या होत्या. सत्ता-सत्तांतरं झाली होती. कारण मी शपथ घेतली 14 मे 2020 रोजी. सरकार आलं 2019 ला. त्या एक वर्षात जो कोरोनाचा काळ होता.. त्यात दर महिन्याला मला.. प्रामाणिकपणे सांगतो 50 हजार रुपये पक्ष कार्यालयातून हेमंत टकलेंकडून यायचे. जे अजितदादांनी पाठवायला सांगितले होते. की, कोरोनाचा काळ आहे त्या पोराची भाषणं बंद आहेत.. त्याच्या घरी त्याची एकुलती एक मुलगी आहे. दुसरं चौथं माणूस त्याच्या घरी कोणी नाही.. आणि आता उदरनिर्वाहचा प्रश्न होईल. म्हणून त्याला फिरायला गाडी द्यावी. तर दादांनी एर्टिगा गाडी दिली होती. जी मी पक्ष कार्यालयात जमा पण केली.’

‘पण मला एक वर्ष 50 हजार दर महिना दादांनी पाठवले. एवढी काळजी दादांनी घेतली. त्यामुळे दादा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अमोल मिटकरी… म्हणून इथे तुकारामांची जी अवस्था आहे रात्रं-दिन आम्हा युद्धाचा प्रसंग..’ असा संपूर्ण किस्सा सांगत आपण अजित पवार यांच्या पाठिशी का आहोत याचं एक प्रकारे त्यांनी समर्थन केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT