Ajit Pawar : “तेव्हा मलाही वेदना व्हायची की, काय बोलण्याची पाळी येतीये”
Ajit Pawar Slams Shinde fadnavis Government after maharashtra budget session end : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शनिवारी सुप वाजले. अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली. मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून अजित पवारांनी पुन्हा एकदा टीका केली.
ADVERTISEMENT
Ajit Pawar Slams Shinde fadnavis Government : अर्थसंकल्पीय अधिवेशन (maharashtra budget session 2023) शनिवारी (25 मार्च) संपले. अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षनेते (leader of opposition in legislative assembly) अजित पवार (ajit Pawar) यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) टीकास्त्र डागले. अधिवेशनादरम्यान सरकारची वर्तणूक आणि सभागृहातील मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM ) यांना खडेबोल सुनावले.
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “मंत्री उपस्थित नसल्याने प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची ही पहिलीच वेळ अध्यक्षांवर अनेकदा आली. आम्ही लोक सभागृहात हजर राहायचो. आश्चर्य वाटेल की, 29 चा कोरम असल्याशिवाय सभागृह चालवता येत नाही. कित्येकदा कोरम देखील नसायचे, तरी देखील आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली. कोरम ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते.”
वाचा – Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे जितेंद्र आव्हाडांवर बरसले, दाखवला फोटो
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, “यांना राज्यात सत्ता हवीये. मंत्री व्हायचं आहे. सरकारी गाडी पाहिजे. बंगला आणि सुरक्षा पाहिजे, पण काम करायचं नाही. आता त्याबाबतीत सत्ताधारी पक्षाचे तालिका अध्यक्ष कालिदास कोळंबर यांनी एवढं झापले आतामध्ये. अक्षरशः सभागृहातील पुढची रांग रिकामी असायची सत्ताधारी पक्षाची.”
हे वाचलं का?
कोडगा माणूस असतो, तसा कळस अधिवेशनात पाहिला -अजित पवार
“लोकशाहीसाठी धोकादायक अशा अनेक गोष्टी घडत आहेत. जनतेचे प्रश्न मांडले जातात, पण सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही. आम्ही महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. सभागृहाचे कामकाज पूर्णपणे चालावे यासाठी आमचा प्रयत्न राहिला. मला काही गोष्टींबद्दल बोलावं लागायचे, तेव्हा मलाही वेदना व्हायचे की, आपल्या काय बोलण्याची पाळी येतीये. कोडगा माणूस कसा असतो, तशा पद्धतीने कोडगेपणाचा कळस या अधिवेशानात आम्ही पाहिला”, अशी टीका अजित पवार यांनी केली.
वाचा – देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ प्रकरण काढलं बाहेर, नेमके आरोप काय?
“अलिकडे सत्तारुढ पक्षाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा नवा पायंडा सुरू झाला. त्याचबरोबर सत्तारुढ पक्षाने लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते, पण सत्ता उपभोगायची आणि आंदोलनेही करायची, हे लोकशाहीसाठी योग्य नाही. मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही, मंत्रिमंडळात एकही महिला घेतलेली नाही”, अशा शब्दात अजित पवारांनी शिंदे-फडणवीस यांना सुनावले.
ADVERTISEMENT
‘अधिवेशनात कोडगेपणाचा कळस’, अजितदादांची सडकून टीका #MaharashtraAssembly #AjitPawar #EknathShinde @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @bb_thorat @AUThackeray @ShivSenaUBT_ pic.twitter.com/V3QTCRNg7Q
— Mumbai Tak (@mumbaitak) March 25, 2023
ADVERTISEMENT
याचे भविष्यात परिणाम होऊ शकतात, अजित पवारांचा इशारा
राहुल गांधींच्या प्रतिमेला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केले. यावर अजित पवार म्हणाले, “विधिमंडळाच्या आवारात ज्या पद्धतीने राष्ट्रीय नेत्यांबद्दल म्हणजे राहुल गांधींच्या विरोधात जोडेमारो आंदोलन केले. ते नियम आणि कायद्याचे उल्लंघन आहे. संसदीय परंपरांना काळीमा फासणारे आहे. मी त्याचा पुन्हा निषेध करतो. आम्ही वारंवार मागणी करूनही संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. याचे भविष्यात परिणाम होऊ शकतात”, असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT