‘…अन्यथा मुख्यमंत्री व्हायचं केवळ स्वप्न राहतं’, अजित पवार असं का बोलले?

भागवत हिरेकर

Ajit Pawar News In marathi : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबद्दल भूमिका मांडली. बहुमताचा आकडा असेपर्यंत चर्चांना काही अर्थ नाही, असे ते म्हणाले.

ADVERTISEMENT

Ajit pawar said without majority no meaning of discussion about become chief minister
Ajit pawar said without majority no meaning of discussion about become chief minister
social share
google news

Ajit Pawar : राज्यात सातत्याने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा होताहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचेही बॅनर्स झळकले होते. पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर अजित पवारांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.

अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी देऊन ते दर्शन घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एक मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. तो होता रोहित पवार यांच्या झळकलेल्या बॅनर्सचा. भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं.

भावी मुख्यमंत्री… अजित पवार काय बोलले?

आमदार रोहित पवार यांचे पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील उर्से टोलनाका या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले आहेत. पत्रकारांनी रोहित पवारांच्या झळकलेल्या बॅनर्सवर प्रश्न केला. त्यावर अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री व्हायचं कोण शिल्लकच राहणार नाही. सर्वजण आपापले फ्लेक्स लावत आहेत.”

हेही वाचा >> Wagh Nakh History : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये कशी पोहोचली?

“माझे फ्लेक्स लागले तेव्हा कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, असे फ्लेक्स लावून काही उपयोग होत नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळतं. कुणी कोणाचे फ्लेक्स लावायचे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे मॅजिक फिगर 145 चा आकडा आहे; तोच मुख्यमंत्री होतो, अन्यथा केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहतं”, असं अजित पवार म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp