‘BJP ने सोमय्यांचा बळी दिला’, आक्षेपार्ह Video वर सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी भाजपवरच गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics News Marathi: मुंबई: भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ (Offensive Video) समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ चॅट समोर आले आहेत. या प्रकरणानंतर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांच्या अद्याप प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. (alleged offensive video bjp leader kirit somaiya thackeray group leader bjp has sacrificed sushma andhare made serious allegations maharashtra political news in marathi)
ADVERTISEMENT
किरीट सोमय्या यांच्या याच वृत्तानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ट्विट करत हा व्हिडीओ समोर येण्यामागे भाजपलाच लक्ष्य केलं आहे. अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपनेच किरीट सोमय्यांचा बळी दिल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.
‘…म्हणून भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय’
अंधारे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘भाजपने मोठ्यात मोठी प्रकरण लिलया जिरवून टाकली. पण सोमय्याचा व्हिडीओ आत्ताच का यावा? महाराष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदीविक्री, पक्ष फोडाफोडी, या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय.’ असं ट्वीट करत सुषमा अंधारेंनी या सगळ्या प्रकरणात भाजपला टार्गेट केलं आहे.
हे वाचलं का?
भाजपने मोठ्यात मोठी प्रकरण लिलया जिरवून टाकली. पण सोमयाचा व्हिडिओ आत्ताच का यावा?
महाराष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदीविक्री, पक्ष फोडाफोडी,
या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपाने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय. @ShivSenaUBT_— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) July 17, 2023
तर विधानपरिषदेतले विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील ट्विट करत या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून सोमय्यांबाबत अनेक तक्रारी असल्याचे दानवे यांनी म्हंटलं आहे. दानवे म्हणाले, ‘किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ लोकशाही मराठी चॅनेल दाखवत आहेत. माझ्याकडे किरीट सोमय्या यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याची माहिती आहे. पण माझ्यासाठी तक्रारी करणाऱ्या त्या महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे. योग्य व्यासपीठावर मी हा विषय मांडणार आहे.’
ADVERTISEMENT
‘त्या’ Video वर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्याच्या 12 तासानंतर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली.
ADVERTISEMENT
‘एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे.’
हे ही वाचा >> Kirit Somaiya: आक्षेपार्ह Video वर सोमय्यांची 12 तासानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
‘माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी देवेंद्र फडणवीस यांना विनंती.’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं.
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
यासोबत किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी चौकशी व्हावी असं पत्रही दिलं आहे.
आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.
हे ही वाचा >> भाजप नेते किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह Video व्हायरल, विरोधकांची भाजपवर तुफान टीका
अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार…. झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे.
ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT