Anil Deshmukh : “अजित पवार-प्रफुल पटेल म्हणाले, ‘पाहिजे ते मंत्रिपद देतो”
Anil Deshmukh on Ajit Pawar-Praful Patel : भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांबद्दल अनिल देशमुखांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला मंत्रिपदाची ऑफर दिली. प्रफुल पटेलांनी चार कॉल केले होते, असे देशमुख म्हणाले.
ADVERTISEMENT
-विकास राजूरकर, चंद्रपूर
ADVERTISEMENT
Anil Deshmukh News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हाड देत अजित पवारांनी बंडाचं निशाण फडकावलं. पक्षातील काही नेत्यांना आणि आमदारांसोबत घेत भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर कर्जतमध्ये झालेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) मेळाव्यात अनेक गौप्यस्फोट केले. पण, त्यानंतर माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेलांचं नाव घेऊन राजकीय बॉम्ब फोडला.
‘अजित पवार आज जे काही सांगत आहेत, त्यांना हे सांगण्यासाठी ६ महिने का लागले? कर्जत येथे अजित पवारांनी जी काही वक्तव्य केली आहेत, ती चुकीची आहेत’, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
हे वाचलं का?
राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) निर्धार मेळावा कर्जतमध्ये पार पडला. यावेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह अजित पवारांनी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी उघड करत शरद पवारांना घेरले. या कार्यक्रमातील अजित पवारांच्या विधानांवर बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.
प्रश्न – तुम्ही सरकारमध्ये जा. मी राष्ठ्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं का?
अनिल देशमुख – शरद पवारांनी अशा पद्धतीने कुणालाही राजीनामा देतो असे सांगितले नाही. या कथा आहेत. जेव्हा एक वेळेस काही लोकांनी अशी योजना सांगितली, तेव्हा त्यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला. आता हेच लोक जुन्या गोष्टी उकरून काढत दिशाभूल करत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> जरांगे भुजबळांना म्हणाले, “तुम्हाला बाथरूम सुद्धा उघडता येणार नाही”
प्रश्न – यशवंतराव चव्हाण येथील आंदोलन नियोजित होते. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर काही लोकांना आणून राजीनामा घेण्यासाठी आंदोलन करायला सांगितले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.
अनिल देशमुख – शरद पवार यांनी राजीनामा देताच वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेली घडामोड कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आमच्यासहित सर्वांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्यास हात जोडून विनंती केली होती. त्यात पटेल आणि तटकरे देखील होते. त्यामुळे आता हीच मंडळी वेगवेगळी वक्तव्य करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ठाकरेंच्या नेत्याला जामीन, शिंदेंवर बोलण्यास बंदी, कोर्टाने घातल्या 5 अटी
प्रश्न – पुण्यात उद्योगपती चोरडिया यांच्या घरी सुद्धा शरद पवार यांनीच चर्चेसाठी बोलावले होते, असे अजित पवार म्हणाले.
अनिल देशमुख – पक्ष एकसंध ठेवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ व्यक्तीने समेटासाठी नेते कार्यकर्त्यांना बोलवल्यास त्यात गैर काहीही नाही. आपण सर्व एकोप्याने राहू यासाठी चोरडिया यांच्या घरी बैठक झाली होती. काही मंडळी वेगळा विचार करत होती. त्या मार्गाने जाऊ नका हे सांगण्यासाठी बैठक बोलावली होती.
हेही वाचा >> “राजीनामा परत घेण्यासाठी शरद पवारांनीच आंदोलन करायला सांगितलं”
प्रश्न – अजित पवार गट बारामतीची देखील जागा लढविणार आहे, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होईल का?
अनिल देशमुख – हा जर -तर चा प्रश्न आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होऊ द्या. सत्तेतील तीन पक्ष मिळून त्यांचा उमेदवार ठरवतील. तर महाविकास आघाडी आमची भूमिका स्पष्ट करेल. जर तर या प्रश्नाचे उत्तर दिले जाऊ शकत नाही
अजित पवार-प्रफुल पटेलांनी काय दिली होती ऑफर?
अनिल देशमुख – अजित पवार यांनी सांगितल्या प्रमाणे मी अनेक बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत उपस्थित होतो. पण, त्या बैठकीत यावर चर्चा होताना मी नेहमीच सांगत होतो की, शरद पवार साहेबांना या वयात आपण असे चुकीचे निर्णय घेवून त्रास देवून नका. ज्या दिवशी हा शपथविधी होता, त्या दिवशी मी पुण्याला होतो. मला अनेक फोन येत होते की मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तुम्ही या. प्रफुल पटेल आणि अजित पवारांनी फोन करून सांगितले होते की तुम्हाला पाहिजे ते मंत्रिपद देतो, तुम्ही आमच्यासोबत या. पण ज्या पक्षाने खोट्या आरोपाखाली मला त्रास दिला, त्या भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT