Anil Deshmukh : "...तर आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकलं असतं"

मुंबई तक

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंना अटक करणार होते, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला.
देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनिल देशमुख-देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप

point

फडणवीसांवर देशमुखांचा गंभीर आरोप

point

समित कदम यांच्याबद्दल काय बोलले देशमुख?

Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रतिज्ञापत्रे मला पाठवली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे प्रतिज्ञापत्र समित कदम घेऊन आले होते, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आज दाखवले. त्यानंतर त्यांनी काही खळबळजनक दावे केले. (Anil Deshmukh has made serious allegations against Devendra Fadnavis that there was an attempt to put Aditya Thackeray in jail)

ADVERTISEMENT

"तीन वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम यांना पाच-सहा वेळा पाठवले होते. एकदा तो माझ्याकडे बंद लिफाफा घेऊन आला. मला सांगितलं की, 'याचं तुम्ही प्रतिज्ञापत्र करून द्या.' त्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं होतं की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं."

समित कदम-देवेंद्र फडणवीसांचे जवळचे संबंध -देशमुख

"तो आणणारा माणूस जो होता, तो समित कदम. त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. घरगुती संबंध आहेत. त्याची पत्नी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधतानाचे सुद्धा फोटो आहेत", असा दावा करत देशमुखांनी फोटो दाखवले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> केतकी चितळेचा यशश्रीच्या हत्येनंतर व्हिडीओ, पोलिसांवर गंभीर आरोप 

"समित कदम हा साधारण कार्यकर्ता आहे. तो नगरसेवक सुद्धा नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली. इतक्या कोणत्या कामाचा माणूस आहे की, सरकारने त्याला वाय सुरक्षा दिली?", असा सवाल देशमुख यांनी केला आहे. 

आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकलं असतं -अनिल देशमुख

"उद्धव ठाकरेंना खोट्या आरोपात फसवायचे. पण, त्यांच्या मुलाला आदित्य ठाकरेला. तीन वर्षापूर्वी अजित पवार विरोधक होते, त्यांचा मुलगा पार्थ... कशा पद्धतीने राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल, या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला", असा दावा देशमुख यांनी केला. 

ADVERTISEMENT

देशमुख पुढे म्हणाले की, "तीन वर्षापूर्वी मी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यावर प्रतिज्ञापत्र करून दिले असते, तर आज उद्धव ठाकरे अटीशर्तींवर असते... आदित्य ठाकरेंना या लोकांनी तुरुंगात टाकलं असतं."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मुंबईत हिट अँड रनचा आणखी एक बळी! 'बीएमडब्ल्यू'च्या धडकेत तरुणाचा मृत्यू

"लहान मुलांना सुद्धा यांनी घाणेरड्या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला. एकतर तुरुंगात जा किंवा भाजपमध्ये या, हेच यांचे धोरण होते. पहिला प्रयोग माझ्यावर जाला, पण तो यशस्वी झाला नाही. म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला. तो यशस्वी झाला. तिसरा प्रयोग अजित पवारांवर केला, तो यशस्वी झाला", असे देशमुख म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT