DCM Shinde VIDEO: 'राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार..' एकनाथ शिंदेंनी माइकच झिडकारला, शिंदेंना एवढा राग का आला?

मुंबई तक

Eknath Shinde Angry: ‘राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार..’ या प्रश्नावर एकनाथ शिंदे हे एका पत्रकारावरच प्रचंड संतापले. प्रश्न विचारणाऱ्या त्या पत्रकाराचा माइकच उद्धव ठाकरेंनी यावेळी झिडकारून लावला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे प्रचंड चिडले (Video Grab: Tv9 Marathi Instagram)
एकनाथ शिंदे प्रचंड चिडले (Video Grab: Tv9 Marathi Instagram)
social share
google news

सातारा: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता. या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट पत्रकाराचा माइकच झिडकारला. हा प्रकार समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे एवढे का चिडले? असा सवाल आता विचारला जात आहे.

नेमकं घडलं तरी काय?

19 एप्रिल 2025 रोजी दुपारी एकनाथ शिंदे हे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर TV9 मराठी या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला. "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे?" असा प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे हे एका क्षणात प्रचंड चिडले. यावेळी त्यांनी पत्रकाराचा माइकच झिडकारला. 'अरे जाऊ दे यार.. काय तू कामाचं बोला यार...' असं म्हणत या मुद्द्यावर काहीही बोलतान थेट काढता पाय घेतला.

हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: 'भांडण मिटवून टाकलं...', उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार!

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, X वर  @yogi_9696 या हँडलने हा व्हिडिओ शेअर करत "दोघे एकत्र येण्याअगोदर फक्त चर्चा ऐकूनच इतकी चिडचिड!" असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना बरंच ट्रोल केलं जात आहे.

एकनाथ शिंदे एवढे का संतापले?

एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेमागे अनेक राजकीय कारणे असू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp