CWC : अशोक चव्हाणांचं काँग्रेसकडून प्रमोशन! राष्ट्रीय कमिटीमध्ये महाराष्ट्रातील 8 नेते
काँग्रेस कार्य समिती : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी काँग्रेस कार्य समिती जाहीर केली. या समितीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली असून, महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक यांचा समावेश करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

Congress Working Committee Member list : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसकडून केंद्रीय कार्य समिती जाहीर करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी CWC च्या (congress working committee) नव्या टीमची घोषणा केली. खरगे यांनी आपल्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर आणि राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचाही समितीत समावेश केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेस कमिटीत स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 8 नेत्यांचा वेगळ्या गटात समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेस कार्य समिती आज (20 ऑगस्ट) जाहीर करण्यात आली. यात मल्लिकार्जून खरगे यांच्यानंतर सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे नाव आहे. त्यानंतर राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटनी, अंबिका सोनी, मीरा कुमार आणि दिग्विजय सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे.
वाचा >> ‘नितीन गडकरींच्या खात्याचे घोटाळे PM मोदींनीच…’, ठाकरेंच्या खासदाराचं खळबळजनक वक्तव्य
काँग्रेसकडून समितीत अनेक तरुण चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. राहुल गांधी तसेच सचिन पायलट, चरणजित सिंग चन्नी, कुमारी सेलजा, दीपेंद्र सिंग हुडा, गौरव गोगोई आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह अनेक नावे आहेत.
याशिवाय यूपीए सरकारमधील केंद्रीय मंत्री एके अँटनी यांनाही खर्गे यांच्या CWC टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. अलीकडेच त्यांचा मुलगा अनिल अँटोनी भाजपमध्ये दाखल झाले, त्यांना भाजपने आपल्या राष्ट्रीय समितीत स्थान दिलेले आहे.