शरद पवार गटाला मोठा धक्का, 'अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष'
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेवर निकाल देत विधीमंडळातील बहुमत हे अजित पवार गटाचे असून राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार गटाचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाला बसला असून आता यापुढं शरद पवार गट काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष

शरद पवार गटाला मोठा धक्का, मूळ राष्ट्रवादी अजित पवारांचीच
NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून यावेळी 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या याचिकांवर हा निर्णय देण्यात आला आहे. शरद पवार गटाकडून 3 तर अजित पवार गटाकडून 4 याचिका सादर करण्यात आल्या होत्या.
बहुमतावरून हा निर्णय
राष्ट्रवादीच्या पाच याचिकांवर निर्णय देताना राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि विधिमंडळ गटाच्या बहुमतावरून हा निर्णय दिला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
घटनेबाबत वाद नाही
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितले की, 'पक्ष घटना, नेतेपदाची रचना तसेच विधीमंडळाच्या बहुमतावर पक्ष ठरवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, राष्ट्रवादीच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही मात्र आमदारांच्या संख्याबळावरच अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निष्कर्षापर्यंत मी आलो आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी अजित पवारांची
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 30 जून रोजी दोन गट पडले होते, त्यानंतर दोन्ही गटांनी घटनेनुसार नेतृत्व निवडल्याचाही दावा करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष कोणाचा हा निर्णय देताना संख्याबळाचा विचार करूनच राष्ट्रवादी अजित पवारांची असल्याचे स्पष्ट झाले आहे असंही त्यांनी स्पष्ट केले.