Ayodhya Ram Temple: ‘मला निमंत्रण…’, उद्धव ठाकरेंनी कॅमेऱ्यासमोरच सांगून टाकलं!
Ayodhya Ram Temple Invitation: अयोध्यातील राम मंदिर सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं की नाही यावरून बरीच चर्चा सुरू होती. मात्र, आता याबाबत स्वत: उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray on Ayodhya Ram Temple Invitation: मुंबई: अध्योयेत 22 जानेवारी 2023 रोजी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला संपूर्ण देशभरातून अनेकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, यावरून आता नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात न आल्याने राज्यात यावरून टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. अशातच आता स्वत: उद्धव ठाकरेंनी याबाबत मोठं भाष्य केलं आहे. तसंच त्यांना निमंत्रण मिळालं की नाही याबाबतही माहिती दिली आहे. ‘मातोश्री’वर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. (ayodhya ram temple i have not been invited uddhav thackeray said in front of the media criticized to bjp)
‘मी एक स्पष्ट करू इच्छितो की.. मला आतापर्यंत कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जाण्यासाठी मला कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. कारण रामलल्ला हे सर्वांचे आहेत.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्यांना राम मंदिरासाठी आमंत्रण मिळालेलं नाही.
राम मंदिर निमंत्रणावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
वादाचा प्रश्नच नाही.. मनात ज्यांचा राम आहे.. त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नव्हतं. तेव्हाही रामाची पूजा सुरूच होती. राम मंदिर नव्हतं तेव्हाही आम्ही अयोध्येत जाऊन शरयू आरती केलीच आहे. त्यामुळे ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते.
येऊ दे.. तिकडे जाणं न जाणं यात राजकारणाचा भाग नाही.. यामध्ये मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी फुशारकी मारू नये. त्यात लाखो कारसेवकांचा तिकडे लढा होता. त्यासाठी अडवाणींचे खास करून.. म्हणजे त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हे आज झालंच नसतं..
माझं तर सोडाच.. अडवाणीजी आणि मुरली मनोहरजी यांनाही आमंत्रण नाही असं ऐकलंय मी.. म्हणून मला असं वाटतं की, याचा राजकीय इव्हेंट होऊ नये.. तो एक मोठा अस्मितेचा लढा होता तो पूर्ण झाला असं मला वाटतं
मी एक स्पष्ट करू इच्छितो की.. मला आतापर्यंत कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जाण्यासाठी मला कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. कारण रामलल्ला हे सर्वांचे आहेत.
माझी फक्त एकच विनंती आहे की, राम मंदिराचं जे लोकार्पण होणार आहे त्याचा पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये. राम ही काय एका पक्षाची प्रॉपर्टी नाही. ते सर्व राम भक्तांच्या तो आस्थेचा विषय आहे. त्यावर तुम्ही तुमचं राजकारण करू नका..
त्यामुळे मला निमंत्रणाची अजिबात गरज नाही. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी दर्शन घेऊ शकतो.
तो एकच असा काही मुहूर्त नाही की, त्या दिवशीच जाऊन मी दर्शन घेतलं पाहिजे. मला वाटतं की, त्यांना इव्हेंट करायचा आहे. त्यामुळे हे सगळं होऊ दे.. मला राजकारण करायचं नाही.
हे ही वाचा>> Ram Mandir : ‘फडणवीसांच्या वजनामुळे बाबरी पडली..’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपवर निशाणाच साधला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी त्यांची पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT