‘अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर वाटोळं होईल’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांनाही इशारा
बच्चू कडू न्यूज : अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राज्यात सुरू आहे. मात्र, त्यांना आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
Bacchu Kadu News : उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या आमदार बच्चू कडू एकनाथ शिंदेंसोबत गेले. पण, त्यानंतर त्यांच्या पदरी निराशाच पडलीये. त्यामुळे त्यांची नाराजी काही लपून राहिलेली नाही. शिंदेंच्या सेनेकडून कडूंना सावत्र वागणूक मिळत असल्याचे दुजोरे कडूंकडूनच दिले जात आहेत. त्यातच आता बच्चू कडू यांनी अजित पवारांबद्दल एक मोठं विधान केलंय. (Bacchu kadu opposed to ajit pawar as chief minister)
अजित पवारांवर आरोपांची राळ उडवत भाजपसोबत सरकारमध्ये गेलेल्या आमदारांची कोंडी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अजित पवार 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक गट घेऊन भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले. इतकंच नाही, तर अर्थमंत्रीही झाले. पण, ते लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होतेय. त्यावर बोलताना बच्चू कडूंनी अप्रत्यक्षपणे विरोधक केलाय.
बच्चू कडू अजित पवारांबद्दल काय बोलले?
आमदार बच्चू कडू गोंदियात प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी भूमिका मांडली. आमदार कडू म्हणाले, “शरद पवार भाजपबरोबर गेले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं वाटोळं होईल. पण, एकनाथ शिंदेंच्या कामात कुणी आडवं येऊ नये”, असं विधान त्यांनी केलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बच्चू कडू यांचा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना इशारा
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाचं निमंत्रण मात्र बच्चू कडू यांना देण्यात आलं नाही. त्यामुळे नाराज झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांनी जागावाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
वाचा >> Exclusive: भाजप अजितदादांना संपवणार,रोहित पवारांचं खळबळजनक वक्तव्य
टीव्ही 9 वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडूंनी म्हटलंय की, “आम्ही विधानसभेची तयारी करतोय. 15-16 मतदारसंघात बांधणी सुरू केली आहे. जर शक्य झालं, तर युतीमध्ये आणि नाही झालं तर स्वबळावर लढण्याची आमची मानसिकता आहे.”
ADVERTISEMENT
वाचा >> Mumbai crime: सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड
“आम्ही कुठल्याही पक्षाला टार्गेट केलेलं नाही. सामान्य व्यक्तींना सोबत घेऊन चालणारा उमेदवार कोणता, तो आम्ही शोधत आहोत. यात काही विदर्भ, अमरावती विभाग, काही मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्र, खान्देश असे 15 मजबूत उमेदवार आमचे राहतील”, असे सांगत बच्चू कडू यांनी जागावाटपात न्याय मिळाला नाही, तर स्वबळावर लढू असा इशाराच अप्रत्यक्षपणे दिलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT