Badlapur News: '...तर ते सुद्धा विकृत आहेत', बदलापूर घटनेवरून ठाकरेंची CM शिंदेंवर जहरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

बदलापूर घटनेवरून ठाकरेंची CM शिंदेंवर जहरी टीका
बदलापूर घटनेवरून ठाकरेंची CM शिंदेंवर जहरी टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर प्रकरणावरून ठाकरें CM शिंदेंवर संतापले

point

CM शिंदेंवर उद्धव ठाकरेंंची जहरी टीका

point

महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला बंदची हाक

Uddhav Thackeray: मुंबई: बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली आहे. ज्यानंतर आज (22 ऑगस्ट) शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची नेमकी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी शब्दात टीकाही केली. (badlapur school news so they are also perverts uddhav thackeray venomous criticism of cm shinde over badlapur incident)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तुफान टीका, ठाकरे संतापले

'बदलापूरमध्ये जे घडतंय तो जनतेचा उद्वेग, उद्रेक आहे. त्यासाठीच आपण 24 ऑगस्टला बंद पुकारला आहे. उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.' 

'ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसारखी ही काही राबवलेली योजना नव्हती. मुळात त्यांचंच घर आहे हे. ठाणे जिल्ह्यातच ही घटना घडली आहे. जी घटना घडली किंवा दुष्कृत्य ते अमान्य करतात का? काल मुख्यमंत्री कुठे होते?'

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Badlapur : 'DCP चा फोन आला, FIR बदललं...ते प्रकरण दाबण्यासाठी...' कुटुंबीयांनी सांगितली Inside Story

'एकीकडे राज्यभर निषेध झाला पण दुसरीकडे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीसाठी हात पसरुन बसले होते. तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राख्यांच्या बंधनाला तरी जागा.. किती निर्लज्ज व्हायचं..' 

'मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत. त्यांच्या अकलेच्या दिवाळखोरपणाबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि जनतेचा पैसा वापरून जी योजना आणली आहे तशी ही योजना नव्हतं. हे विकृती आहे.. त्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत. विकृत मानसिकतेचे आहेत.' 

ADVERTISEMENT

'ज्यांना-ज्यांना या दुष्कृत्याचा निषेध करण्यात राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत. किंवा ते सगळे जणं या नराधमांचे पाठिराखे आहेत.' 

ADVERTISEMENT

'फ्लेक्सेस असतील तिथे.. पण निषेध व्यक्त करू नये का? एखाद्या घटनेचा निषेध करणं हे यांना कधीपासून राजकारण वाटायला लागलं? म्हणजे निषेध पण करायचा नाही?' 

'पहिलं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं की, ते नराधमांच्या बाजूने आहेत की विरुद्ध आहेत. काल सुद्धा ते तिथे पोहचायला पाहिजे होते. पण हे रत्नागिरीत डामडौलात बसले होते.'

हे ही वाचा>> Badlapur: 'तुझा रेप झालाय का?, की तू बातमी करतेस...', ही आहे 'त्या' संपूर्ण प्रकरणाची Inside स्टोरी

'त्यांनी जे म्हटलं की, फाशी दिली.. त्यासाठी एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिली आणि कोणती घटना होती याचीही माहिती काढा.. यासाठी एसआयटी नेमा.' 

'क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झालेला आहे. त्यांना फक्त जनतेच्या भावनांशी खेळता येतं. म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की, अशी व्यक्ती राज्यकर्ती आहे, एक तर गद्दार आहे. राज्य करताना जनतेच्या भावनेशीही गद्दारी करत आहेत. याबद्दल मला खरंच दु:ख होतंय.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT