मुंबई Takचावडी: ‘शरद पवारांनी हात जोडले तरी…’, अजित पवारांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरातांच मोठं विधान
कॉंग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasahab Thorat) यांनी मुंबई Takचावडीवर मोठं विधान केले आहे. शरद पवार फक्त महाराष्ट्रात हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल आणि निवडणूकीच्या निकालात चांगला आकडा आणतील असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहे. त्याच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
गेल्या 2 जुलै रोजी अजित पवार (Ajit pawar) आणि इतर नेत्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.या शपथविधीनंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली होती. या फुटीनंतर आता शरद पवार (Sharad pawar) वयाच्या 83 व्या वर्षी पुन्हा पक्षाला उभारी देऊन करिश्मा करून दाखवतील, असा सवाल संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. यावर आता कॉंग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasahab Thorat) यांनी मुंबई Takचावडीवर मोठं विधान केले आहे. शरद पवार फक्त महाराष्ट्रात हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल आणि निवडणूकीच्या निकालात चांगला आकडा आणतील असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहे. त्याच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे. (balasaheb thorat big statement on ncp crisis ajit pawar vs sharad pawar ncp maharashtra politics)
ADVERTISEMENT
मुंबई Takचावडीवर आज कॉंग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय घडामोडींवर दिलखुलास उत्तरे दिली. राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार पुन्हा पक्षबांधणी करू शकतील का, असा सवाल त्यांना चावडीवर विचारण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, शरद पवार यांना काही वेगळे करायची गरज नाही. पवार फक्त हात जोडून महाराष्ट्रात फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल आणि निवडणूकीत चांगला निकाल आणतील असे थोरात म्हणाले. तसेच येत्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत चांगला निकाल येईल. एकमेकांच्या मदतीने आमचा चांगला निकाल येईल ही वस्तुस्थिती असल्याचे थोरात यांनी सांगितले.
हे ही वाचा : रश्मी वहिनीसमोरच बोललो, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’तला प्रचंड इंटरेस्टिंग किस्सा
तसेच शरद पवार यांनी कॉंग्रेससोबत येऊन राजकारण करावं का? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, शरद पवार यांनी स्वतंत्रपणे राजकारण केले आहे, त्यांचा आणि आमचा विचार वेगळा नाही, फक्त आम्ही दोन भागात आहोत ही वस्तुस्थिती आहे. सध्या तरी याच पद्धतीन आम्ही चाललो आहोत आणि विजय देखील मिळवू, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
हे वाचलं का?
दरम्यान गेल्या 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची आणि इतर 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. राष्ट्रवादीत आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहे. दरम्यान दोन्ही गटांमध्ये अदयाप कोणत्या नेत्याला सर्वांधिक आमदारांचा पाठींबा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. मात्र येणाऱ्या काळात हे स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : BJP: अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला?, ‘हा’ सर्व्हे भाजपसाठी धोक्याची घंटा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT