Basavaraj Patil : अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला आणखी एक झटका! माजी मंत्र्याचा राजीनामा

भागवत हिरेकर

big jolt to congress : मराठवाड्यातील एक महत्त्वाचे नेते असलेल्या बसवराज पाटील यांनी काँग्रेसला राम राम केला.

ADVERTISEMENT

Basavaraj Patil will be join bjp.
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक झटका

point

बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडली

point

अशोक चव्हाणानंतर दुसरा नेता भाजपच्या वाटेवर

Basavaraj Patil News : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी मंत्री माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसला राम राम केला आहे. (basavaraj patil resigned from Congress)

माजी मुख्यमंत्री आणि मराठवाड्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असलेल्या अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात असतानाच आणखी एक राजीनामा पडला आहे. 

हेही वाचा >> 'लिमिटबाहेर गोष्ट गेली की, कार्यक्रमच करतो मी...', CM शिंदे स्पष्टच बोलले; जरांगेंना थेट इशाराच?

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बसवराज पाटील यांचं नाव हे काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यामध्ये घेतलं जात होतं. पाटील यांचा राजीनामा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर काँग्रेसलाही मोठा झटका आहे. 

भाजपत जाणार?

बसवराज पाटील यांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होतं. पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचेही म्हटले जात होते. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने या शक्यता खरा ठरताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगितले जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp