‘बायको आत्महत्या करेल सांगून शिंदेंकडून घेतलं मंत्रिपद’, भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब
शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या काही आमदारांबद्दल गौप्यस्फोट केला. आमदारांनी एकनाथ शिंदेंवर दबाव टाकून मंत्रिपदं मिळवली, असा दावा गोगावलेंनी केलाय.
ADVERTISEMENT
Bharat Gogawale news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पुन्हा एक राजकीय बॉम्ब टाकला. पण, हा बॉम्ब विरोधकांबद्दलचा नाही, तर एकनाथ शिंदेंवर दबाव टाकून मंत्रिपद मिळवणाऱ्या त्यांच्या गटातील आमदारांचा आहे. भरत गोगावलेंच्या या बॉम्बने मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत’, असं सांगत आमदार भरत गोगावले यांनी शिंदेंनाच घरचा आहे दिला आहे.
वाचा >> Kalyan Crime: आईसमोरच सपासप वार…! तरुणीने रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव
भरत गोगावलेंचं चर्चेचा विषय ठरलेलं भाषण आहे अलिबागमधील. अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी 16 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.
हे वाचलं का?
शिंदेंवर दबाव, आमदार भरत गोगावलेंचं ते विधान काय?
या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना भरत गोगावलेंनी त्यांचं मंत्रिपद कसं हुकलं याचा किस्सा सांगितला. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या गटातील काही आमदारांनी एकनाथ शिंदेंवर दबाव टाकून मंत्रिपद घेतली, असा स्फोटक दावा भरत गोगावले यांनी केला आहे.
संभाजीनगरचा तो आमदार कोण?
या कार्यक्रमात गोगावले म्हणाले, “आमचे मुख्यमंत्री अडचणीत सापडलेले दिसले आम्हाला. आम्ही बोललो ठिक आहे, पुढे काय? एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवतील. एक बोलतो राजीनामा देईन. साडेपाचला एका फोन केला. बोललो काय रे, संभाजीनगरला तुम्हाला पाचपैकी दोघांना दिले. आम्ही तीनपैकी एक पण घेत नाही. आम्ही थांबतो. मी बोललो तुला एवढी घाई कशाला? त्याला समजावलं.”
ADVERTISEMENT
वाचा >> NCP चा नेमका अध्यक्ष कोण? शरद पवारांकडे मागितले ‘पुरावे’, फक्त ‘एवढीच’ मुदत
गोगावलेंनी छत्रपती संभाजीनगरच्या आमदारांचा उल्लेख केला. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार संजय शिरसाट यांचं नाव चर्चेत आलं आहे. संजय शिरसाट हे सुरूवातीपासूनच मंत्रिपदासाठी उत्सुक आहे. त्यांनी वारंवार हे इच्छा बोलूनही दाखवली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला आहे.
ADVERTISEMENT
‘नारायण राणे संपवतील’, गोगावलेंनी सांगितला मंत्रिपद सोडण्याचा किस्सा
पुढे गोगावले म्हणाले, “आता बायकोवाल्याचं काय करायचं? मग साहेबांना (एकनाथ शिंदे) बोललो त्याच्या बायकोला जगवायला पाहिजे म्हणून साहेबांना (एकनाथ शिंदे) बोललो त्याला देऊन टाका. आणि त्याला नारायण राणेंनी संपवायला नाही पाहिजे. आपली सीट कमी होईल. बोललो त्याला पण द्या. म्हणालो मी थांबतो तुमच्यासाठी आणि मी थांबलो तर आजपर्यंत थांबलोय”, असं सांगत गोगावलेंनी मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली. गोगावलेंच्या या विधानानंतर शिंदेंच्या शिवसेनेत सगळं आलबेल नसल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT