“मुंबईकरांनो, युवराज आदित्य ठाकरेच जबाबदार”, आशिष शेलारांकडून कोंडी, पदवीवरच घेतली शंका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bjp ashish shelar criticize thackeray group aditya thackeray bmc air pollution maharashtra politics
bjp ashish shelar criticize thackeray group aditya thackeray bmc air pollution maharashtra politics
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हवेचा स्तर खालावलाय. त्यामुळे मुंबईतील हवा प्रदुषण नियंत्रणासाठी आता महापालिकेने मार्गदर्शन सुचना जाहिर केल्या आहेत. याच मुद्यावरून आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरेंना घेरले आहे. मुंबईतील हवेचे प्रदुषण वाढण्यास आणि आबालवृद्धांना श्वसनाचे आजार जडण्यास ठाकरेच जबाबदार असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच पर्यावरण प्रेमीचे ढोंग करणाऱ्या आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) डिग्री तपासून घ्यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केले आहेत. (bjp ashish shelar criticize thackeray group aditya thackeray bmc air pollution maharashtra politics)

ADVERTISEMENT

मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर (Mumbai Air Pollution) भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे यांना घेरले आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार सध्या मुंबई 6 हजारांहून अधिक ठिकाणी बांधकामे सुरु आहेत. या बांधकामांमुळे होणारी धुळ, मुंबईत येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक आणि अवजड वाहनांमुळे होणारे प्रदुषण आणि सिमेंट मिश्रण प्लांट, या सगळ्या गोष्टी मुंबईची हवा खराब होण्यास कारणीभूत असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. पण उबाठाने कोविडमध्ये कटकमिशनसाठी बिल्डरांवर प्रिमियम सवलतींची खैरात केली, त्यामुळेच गेल्या दोन वर्षात मुंबईत एकाचवेळी वारेमाप बांधकामे सुरु असल्याचा आरोप आशिष शेलारांनी करत ” पैसा झाला मोठा आणि बिल्डरांकडून वसुलीला नाही तोटा” असा टोला ठाकरेंना लगावला. त्यामुळे कटकमिशनसाठी मुंबईकरांचा असा गळा घोटू नका, असे आवाहन देखील आशिष शेलारांनी ठाकरेंना केले.

हे ही वाचा : Alibaug Crime : आईवर कोयत्याने वार, अंगणात जिवंत जाळलं; उच्चशिक्षित तरूणाचं राक्षसी कृत्य

मुंबईतील आबालवृद्धांचे श्वास कोंडण्यास, श्वसनाचे आजार जडण्यास व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास आदित्य ठाकरेंच जबाबदार असल्याची टीका आशिष शेलारांनी केली. कारण गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवर ठाकरेंनी सत्ता उपभोगली, पण मुंबईच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावणारी यंत्रणा उभारली नाही, त्यामुळे “डंम्पिंग ग्राऊंडवर कचरा झाला मोठा आणि इथेही कटकमिशनला नाही तोटा!, असा टोला शेलारांनी ठाकरेंना लगावला.

हे वाचलं का?

दरम्यान प्रसिद्धीसाठी यांनी आरेला जंगल घोषित केले. पण नुसते जंगल घोषित करून प्रदुषण रोखता येते का? असा सवाल यानिमित्त शेलारांनी उपस्थित केला. त्यामुळे मतलबी, ढोंगी, स्वार्थी, मुंबईकरांचा श्वास गुदमरून टाकणाऱ्या पर्यावरण प्रेमाचे धडे युवराज कुठल्या विद्यापीठात शिकले? यांची डिग्री खरंच तपासून घ्यावी काय? असा सवाल शेलारांनी केला आहे. आशिष शेलारांच्या या टीकेनंतर आता ठाकरे गटाकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manoj Jarange : ‘जरांगेला अटक करा, मुसक्या…’, सदावर्ते फडणवीसांचं नाव घेऊन काय बोलले?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT