नितीन गडकरींचा भाजपला टोला, संजय राऊत म्हणाले,’अभिनंदन! सत्य परिस्थिती…’
दुकान चांगल चाललंय, पण भाजपचं सध्याचं दुकान डुप्लिकेट माल विकणाऱ्यांचे आहे.नितीन गडकरी सारखा ज्येष्ठ नेता तेच सांगतोय. त्यामुळे नितीन गडकरींचे अभिनंदन केले पाहिजे त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत दाखवली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आमचं दुकान चांगल सुरु आहे. पण जुने गिऱ्हाईक कुठे दिसेना,अशी खंत व्यक्त करत स्वपक्षाला घरचा आहेर दिला होता. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुकान चांगल चाललंय, पण भाजपचं सध्याचं दुकान डुप्लिकेट माल विकणाऱ्यांचे आहे.नितीन गडकरी सारखा ज्येष्ठ नेता तेच सांगतोय. त्यामुळे नितीन गडकरींचे अभिनंदन केले पाहिजे त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत दाखवली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. (bjp central minister nitin gadkari taunts bjp sanjay raut reaction)
ADVERTISEMENT
संजय राऊत यांची आज सकाळी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांनी भाजपला लगावलेल्या टोल्यावर प्रतिक्रिया दिली. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा भाजपा पक्ष कुठे आहे? ज्यांच्यासोबत आम्ही 25 वर्ष काढली, तो पक्ष कुठे आहे? ते एनडीए कुठे आहे ? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. भाजपचे दुकान जोरात असेल, पण ते डुप्लिकेट माल विकणाऱ्यांचे आहे. नितीन गडकरी सारखा ज्येष्ठ नेता तेच सांगतोय,आणि त्यांनी सत्यस्थितीवर परखड मत व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
हे ही वाचा: Raj Thackeray: ‘मोदींनी आरोप करताच 6 दिवसात अजित पवार..’, राज ठाकरे बरसले
महाराष्ट्रातल्या भाजप पक्षात 70 टक्के लोक डुप्लिकेट माल आहेत, त्यांचे मित्रपक्षही डुप्लिकेट आहेत. आता हे आम्ही म्हणत होतो तिथपर्यंत ठिक होते, पण आता तुमच्याच संघ परिवाराशी संबंधित, ज्या नेत्याने भाजप पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष केलाय, त्या नेत्याने यावर भाष्य केलंय, असे देखील संजय राऊत य़ांनी अधोरेखीत केले.
हे वाचलं का?
कुठे आहे भाजप पक्ष? कुठे आहे विचारधारा? ज्या विचारधारेसाठी आम्ही एकत्र आलो होतो, अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे….महाराष्ट्रात तो भारतीय पक्ष दिसतोय का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत, नितीन गडकरी यांनी तीच खंत व्यक्त केल्याचे सांगितले. तसेच भाजपला ज्यांनी धुतले तेच लोक आता तिकडे आहेत, आणि भाजपने भ्रष्टाचारासंदर्भात ज्यांना धुतलं, असे लोक यांच्या आसपास आहेत, त्यामुळे नितीन गडकरींचे अभिनंदन केले पाहिजे त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत दाखवल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
नितीन गडकरी काय म्हणाले?
दुकान चालायला लागतं तेव्हा गिऱ्हाईकाची कमतरता नसते. आता आमचं दुकान चांगल सुरु आहे. गिऱ्हाईकांची कमी नाही.मात्र, खरे जुने गिऱ्हाईक कुठे दिसेना, असे विधान करून नितीन गडकरी यांनी स्वपक्षाला घरचा आहेर दिला होता. भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुल शर्मा यांच्या अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा: Nitin Gadkari: ‘गडकरींसोबत मी नक्कीच उभा राहीन’, रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांमुळे मोठी खळबळ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT