Maharashtra New CM: महाराष्ट्रातील सत्तेचा नवा फॉर्म्युला आला समोर, पण मुख्यमंत्री...

रोहित गोळे

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह 43 मंत्र्यांचा सरकारमध्ये समावेश होऊ शकतो. आता सत्तेसाठी महायुतीचा फॉर्म्युला हा समोर आला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सत्तेचा नवा फॉर्म्युला आला समोर
महाराष्ट्रातील सत्तेचा नवा फॉर्म्युला आला समोर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला

point

महाराष्ट्रातील सत्तेचा नवा फॉर्म्युला

point

पाहा कोणाला किती मंत्रिपदं मिळणार

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा दावा सोडला असला तरी महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्याबाबत सस्पेन्स कायम आहे. सरकार स्थापनेनंतर कोणताही असंतोष निर्माण होऊ नये, यासाठी महायुती प्रथम मंत्रिमंडळ विभाजनाच्या सूत्रावर लक्ष केंद्रित करत आहे. या ऐतिहासिक विजयाने महायुतीचे नेते उत्साहात असून, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करण्याची घाई नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ आणि खात्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यावर युतीचे लक्ष आहे. म्हणजेच आधी मंत्रिमंडळातील जागा सर्वसहमतीने ठरवल्या जातील, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. यावेळी भाजपचा मुख्यमंत्री असेल यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हे ही वाचा>> Maharashtra New CM: शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, पण मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?

आघाडीचे सर्वोच्च नेतृत्व सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ रचनेबाबत चर्चा करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होऊन नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.

आधी सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाईल

शिवसेना सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजप हायकमांड मुख्यमंत्री पद आणि मंत्रिपदाच्या विभागणीवरून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. भाजपने अद्याप केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख आणि वेळ ठरलेली नाही. महायुतीत आधी सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार असल्याचे अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर मंत्रिपदांचे वितरण होईल. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp