Lok Sabha 2024 : भाजपला ‘या’ 129 जागांची चिंता! मोदी पुन्हा सत्तेत कसे येणार?

भागवत हिरेकर

मोदींनी तिसऱ्या टर्मची घोषणा केली आहे. 2024 च्या निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा आणि 51 टक्क्यांपेक्षा जास्त मतांचे लक्ष्य भाजपचे आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये जागा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला 400 चे लक्ष्य गाठणे सोपे जाणार नाही.

ADVERTISEMENT

There are five states in South India, Karnataka, Telangana, Andhra Pradesh, Tamil Nadu and Kerala. There are 129 Lok Sabha seats in these states.
There are five states in South India, Karnataka, Telangana, Andhra Pradesh, Tamil Nadu and Kerala. There are 129 Lok Sabha seats in these states.
social share
google news

Bjp Plan for Lok Sabha 2024 Election : ‘अबकी बार 400 पार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ असा हुंकार भरत भाजपने लोकसभा 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केलीये. भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सूक्ष्म पद्धतीने काम सुरू केलं आहे. पण, लोकसभेच्या 129 जागा आहेत, ज्यांची चिंता भाजपला आहे. त्या कोणत्या आहेत आणि त्यामुळे भाजपचे ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं मिशन कसं प्रत्यक्षात येईल, हे जाणून घ्या…

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतून एक बाब समोर आली, ती म्हणजे भाजपची ताकद आहे, ती उत्तर भारतात. पण, उत्तर भारतावर विसंबून तिसऱ्यांदा सत्तेत येता येईल, या भरवशावर भाजप नाही, असेच दिसत आहे. कारण दोन आठवड्यात पंतप्रधान मोदींचे दक्षिणेत दोन दौरे झालेत.

१४ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी दिल्लीतील तामिळनाडूतील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुरुगन यांच्या घरी पोंगल सण साजरा केला. आंध्र प्रदेशचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदी दोन आठवड्यात दुसऱ्यांदा केरळमध्ये होते. त्यामुळे मोदी-भाजपची नजर दक्षिणेवर जास्त असल्याचे दिसत आहे.

भाजपची दक्षिणेवर ‘स्वारी’

दक्षिणेतील राज्यात भाजपला फारसं यश मिळालेलं नाही. सातत्याने पक्ष या राज्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आला आहे. देशात दोन वेळा सत्ता मिळवूनही भाजपला दक्षिणेत आपली पकड मजबूत करता आलेली नाही. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ ही पाच राज्ये दक्षिणेत येतात. पाच राज्यात मिळून लोकसभेच्या १२९ जागा आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp