भाजपने खासदारांना बजावला व्हीप, काँग्रेसनेही... लोकसभेत काय घडतंय?

रोहित गोळे

One Nation-One Election: वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित विधेयक आज (17 डिसेंबर) म्हणजेच मंगळवारी लोकसभेत मांडले जाणार आहे. त्यासाठी भाजपने आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
भाजपने खासदारांना बजावला व्हीप
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपने आपल्या सर्व खासदारांना बजावला व्हीप

point

काँग्रेसकडूनही तीन ओळींचा व्हीप जारी

point

लोकसभेत नेमकं घडणार तरी काय?

One Nation-One Election BJP Whip: नवी दिल्ली: वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित विधेयक आज (17 डिसेंबर) म्हणजेच मंगळवारी लोकसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सभागृहात मांडणार आहेत. या विधेयकाला 'संविधान (129 वी सुधारणा) विधेयक 2024' असे नाव देण्यात आले आहे. हे विधेयक मांडल्यानंतर सरकार ते संसदेच्या संयुक्त समितीकडे (जेपीसी) पाठवण्याची शिफारस करेल. या विधेयकाची प्रत खासदारांना देण्यात आली आहे. याच विधेयक मंजुरीसाठी आता भाजपने आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

त्याचवेळी काँग्रेसनेही आज तातडीची बैठक बोलावून तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. वन नेशन, वन इलेक्शनला विरोधक सातत्याने विरोध करत आहेत. सध्या लोकसभेचे आजचे कामकाज प्रचंड गोंधळाचे होणार आहे.

हे ही वाचा>> '...तर अडीच महिन्यातच मंत्री बदलू', महायुतीचा 'हा' कोणता फॉर्म्युला?

देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची तयारी सुरू

देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची तयारी सुरू आहे. कायदे मंत्री आज लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक मांडणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद घटना दुरुस्ती विधेयकात आहे. तर केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयकात दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक चक्राच्या या योजनेनुसार आणण्याची तयारी आहे. विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवले जाऊ शकते.

सरकार हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्याची शिफारस करेल

लोकसभेच्या अजेंडामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, संविधान (129 वी दुरुस्ती) विधेयक, 2024 केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल सादर करतील. हे विधेयक 'वन नेशन, वन इलेक्शन' म्हणून ओळखले जाते. त्याच्या प्रस्तावनेनंतर, मेघवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे तपशीलवार चर्चा करण्यासाठी पाठवण्याची विनंती करतील.

हे वाचलं का?

    follow whatsapp