BJP च्या प्रचारातून गायब… वसुंधरा राजे दिसल्या CM अशोक गेहलोतांसोबत!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Vasundhara Raje has not yet made a single tweet on any issue related to BJP's Parivartan Yatras and assembly elections. This question is in discussion because Vasundhara Raje did not even reach her area Jhalawar.
Vasundhara Raje has not yet made a single tweet on any issue related to BJP's Parivartan Yatras and assembly elections. This question is in discussion because Vasundhara Raje did not even reach her area Jhalawar.
social share
google news

Vasundhara CM Ashok Gehlot : राजस्थानमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. येत्या काही दिवसांत विधासभेच्या निवडणुका होणार असून, सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत. दरम्यान, एका फोटोने सर्वांनाच धक्का बसला आहे. या फोटोत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे एका कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot and senior BJP leader and former CM Vasundhara Raje are seen together in a program.)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री गेहलोत आणि वसुंधरा राजे यांची ही भेट राजस्थानच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या उद्घाटनानिमित्त झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी आणि एलओपी राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे निवडणुकीपूर्वीच राजस्थानमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा >> Nagpur Rain : काळरात्र… दोन महिलांचा मृत्यू, 400 जणांना सोडावं लागलं घरं; मध्यरात्री काय घडलं?

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, येत्या काही दिवसांत तेथे पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. पण, राजस्थानातील भाजपचा लोकप्रिय चेहरा, दोन वेळा मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा असलेल्या वसुंधरा राजे या सभेच्या तयारीत असक्रिय का दिसत आहेत? या प्रश्नाचे उत्तर राजस्थान भाजपमध्ये कुणाकडेही नाही. भाजपने वसुंधरा राजेंना निवडणुकीपासून दूर ठेवले आहे की, वसुंधरा राजे स्वतः निवडणुकीपासून दूर राहिल्या आहेत हेही स्पष्ट झालेले नाही.

हे वाचलं का?

वसुंधरा राजे निवडणूक प्रचारातून गायब

वसुंधरा राजे यांनी भाजपच्या परिवर्तन यात्रा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर अद्याप एकही ट्विट केलेले नाही. हा प्रश्न चर्चेत आहे कारण वसुंधरा राजे त्यांच्या भागात म्हणजे झालावाडमध्येही पोहोचल्या नाहीत.

आता भाजपच्या प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांना हे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड वाढला आहे. सर्वांचे उत्तर एकच आहे की वसुंधरा राजेजी आमच्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्या निवडणुकीत पूर्णपणे सक्रिय आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पुणे-चंद्रपूरची पोटनिवडणूक होणार नाही.. भाजपला नेमकी कसली भीती?

या संदर्भात राजस्थानमधील भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख नारायण पंचारिया यांना वसुंधरा राजे राजस्थानमधील निवडणूक प्रचारात का दिसत नाहीत, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “जेपी नड्डा आणि अमित शाह दिसत आहेत का, असे उत्तर त्यांनी दिले. वसुंधराजी राष्ट्रीय पातळीवरील नेत्या आहेत आणि मोठ्या निवडणूक प्रचारात येतील, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

यावेळी राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये आमने-सामने लढत आहे. मागील निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 5 टक्क्यांपेक्षा कमी फरकाने जिंकलेल्या जागा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत जवळपास 30 टक्के जागा अशा होत्या ज्यात विजयाचे अंतर 5 टक्क्यांपेक्षा कमी होते.

हेही वाचा >> Maharashtra Political crisis: सुप्रीम कोर्टानं वापरलेले ‘हे’ दोन शब्द… अन् CM शिंदेंचं भवितव्य

त्यामुळे राजस्थान विधानसभा निवडणुकीत एक टक्का मतांचा उलटफेर खेळ बिघडवू शकतो. वसुंधरा राजे या एकमेव भाजप नेत्या आहेत, ज्यांचा राजस्थानातील सर्व जाती आणि सर्व भागात प्रभाव आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT