Mangesh Chavan : “एकनाथ खडसे म्हणजे विकृती, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पनवती”

मुंबई तक

ADVERTISEMENT

BJP MLA Mangesh Chavan warned eknath khadse after his statement about girish mahajan
BJP MLA Mangesh Chavan warned eknath khadse after his statement about girish mahajan
social share
google news

“काही वर्षांपूर्वी फर्दापूरच्या विश्रामगृहात एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत कोण पकडलं गेलं होतं? माझी चूक झाली, मी त्यावेळेस त्यांना सोडलं. मी तिथं पोहचलो म्हणून वाचले. पोलिसांना अटक करू दिली असती, तर आज फायद्यात राहिला असतो”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले. खडसेंच्या याच विधानावर बोलताना भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आम्ही तुमचा खरा इतिहास बाहेर काढू असा इशारा दिला. इतकंच नाही, तर खडसे म्हणजे विकृती, अशी टीकाही त्यांनी केली.

जळगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चव्हाण म्हणाले, “ते वयाने मोठे झाले आहेत. त्यांनी राजकारणात एक चांगला आदर्श पायंडा या जिल्ह्यात घालायला पाहिजे. ते पदावर असताना, त्यांना लोकांनी मानसन्मान दिला. ते पदावर होते म्हणून. त्यांच्या जागेवर जे काम करतात, मग ते मंत्री असतील… ते चांगलं काम करताहेत म्हणून त्यांना (एकनाथ खडसे) खपवले जात नाही, हे यातून सिद्ध होतं.”

पुढे बोलताना मंगेश चव्हाण म्हणाले, “तुम्ही (एकनाथ खडसे) असताना सगळे खडसे साहेब म्हणायचे. भाऊ म्हणायचे. अतिशय डोक्यावर तुम्हाला या जिल्ह्याने घेतलं. दुर्दैवाने तुम्हाला लोकांचं प्रेम पचवता आलं नाही. आणि आता गिरीश महाजन असतील, दुसरे पालकमंत्री असतील, ते जे काम करताहेत. विकास कामांना सोडून उगीच दुसरीकडे भरकवटायचं. लोकांना दुसरीकडे न्यायचं”, अशी टीका चव्हाण यांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या माणसाने लोकांना आयुष्यातून उठवलं -आमदार मंगेश चव्हाण

मंगेश चव्हाण यांनी गंभीर विधान यावेळी केलं. ते म्हणाले, “कपोलकल्पित कहाण्या काहीतरी लोकांना सांगायच्या. म्हणजे खडसेंबाबत बोलायचं म्हटलं, तर खडसे हे एक विकृती आहे, असं मला वाटतं. या माणसाने आयुष्यात काहीही चांगलं केलं नाही. लोकांना आयुष्यातून उठवणं. लोकांना गुन्ह्यात अडकवणं. नको त्या भानगडी लावल्या. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केली. त्याच समाजातील लोक त्याच समाजापुढे उभे कसे करता येतील, कुणाला दाबता कसं येईल, अनेक संस्थांमधील लोकांना त्रास दिला.”

हेही वाचा >> बच्चू कडू-राणा दाम्पत्यात संघर्ष पेटला, लोकसभेच्या जागेवरून दावे प्रतिदावे

“त्यांनी हे मानलं पाहिजे की गिरीश महाजन यांनी एकहाती नेतृत्व सिद्ध केलं आहे. यांना (एकनाथ खडसे) असं वाटायचं की मी म्हणजे उत्तर महाराष्ट्र. खडसेंची परिस्थिती अशी आहे की, स्वतःच्या ग्रामपंचायतीत कुत्र विचारत नाही. स्वतः ग्रामपंचायतीत निवडून येऊ शकले नाही. सगळ्या हातातल्या संस्था ते राष्ट्रवादीत गेल्यामुळे गेल्या”, असा दावा आमदार मंगेश चव्हाण यांनी केला.

ADVERTISEMENT

‘खडसे कपाळकरंटे, राष्ट्रवादीला पनवती’

आमदार चव्हाण असंही म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एव्हढी धुसमूस आहे की, राष्ट्रवादी खडसे नसते तर चांगल्या परिस्थितीत होती. हातातल्या संस्था घालवल्या. कपाळकरंटं माणूस कसं असतं, तसा आहे माणूस आहे. राष्ट्रवादीला पनवती आहे. तिथं गेले आणि पूर्ण राष्ट्रवादीचा सत्यानाश करत आहे. बरं झालं तिकडे गेले.”

ADVERTISEMENT

“त्यांच्या विकृतीबद्दल काय बोलावं? ते वयाने मोठे आहेत, आम्ही बऱ्याचदा बोलण टाळण्याचा प्रयत्न करतो, पण इतका हलकट, निर्लज्ज, बेशरम माणूस मी राजकारणात बघितला नाही. कुणाच्या परिवाराविषयी, कुणाविषयी काय बोलतोय, काय नाही. ते आमचे नेते आहेत, आम्ही सांभाळतो. जर तुमचा काळा इतिहास सांगितला, तुमचे सगळे रंग लोकांना आता दाखवले, तर तुमच्याही घरातही बाया सुना, मुली आहेत”, असा अप्रत्यक्ष इशारा चव्हाण यांनी खडसे यांना दिला.

हेही वाचा >> काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?

“अशा पद्धतीची विधानं त्यांनी करायला नको. नाईलाजाने ते परत परत आमच्या नेत्यांविषयी बोलले तर त्यांचा खरा इतिहास त्यांच्याच घरातील लोकांनी आम्हाला सांगितला आहे. आमचे बाबा कसे आहेत. ते आम्हाला नाईलाजाने लोकांना सांगायची वेळ यायला नको”, असं आमदार चव्हाण म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT