Exclusive: भाजप अजितदादांना संपवणार,रोहित पवारांचं खळबळजनक वक्तव्य
. जेव्हा एखादा लोकनेता भाजपकडे जातो, तेव्हा भाजपच्या इतिहासाप्रमाणे त्याला संपवले जाते. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे अजित दादांनाही (Ajit Pawar) संपवलं जाणार आहे, असे खळबळजनक वक्तव्य शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबई Tak वर केले आहे.
ADVERTISEMENT
भाजप सारखा पक्ष एखाद्या पक्षाला जवळ घेऊन संपवतो. लोकनेत्यांबाबतही भाजपची अशीच भूमिका असते. जेव्हा एखादा लोकनेता भाजपकडे जातो, तेव्हा भाजपच्या इतिहासाप्रमाणे त्याला संपवले जाते. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे अजित दादांनाही (Ajit Pawar) संपवलं जाणार आहे, असे खळबळजनक वक्तव्य शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबई Tak वर केले आहे.(bjp will finish ajit pawar ncp rohit pawar big statement on mumbai tak excluisive interview)
ADVERTISEMENT
मुंबई Tak वर अभिजीत करंडे यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत रोहित पवार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. महाविकास आघाडीची हिच खासियच आहे, थोडी फार शंका वाटली की आम्ही खुल्या पद्धतीने चर्चा करतो. भाजप सारखं एखाद्या पक्षाला जवळ घेऊन संपवत नाही. चर्चा न करता मागच्या बाजूने पक्ष संपवणे ही भाजपची प्रवृती आहे महाविकास आघाडीची नाही, असा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
हे ही वाचा : Sharad Pawar : ‘सत्तेच्या मागे जा,पण माणुसकी…,’ शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
जेव्हा एखादा नेता भाजपसोबत जातो, तेव्हा भाजपच्या इतिहासाप्रमाणे त्याला संपवले जाते. भाजपचे लोकनेते देखील हेच संपवतात. पंकजा ताई, पुर्वी मुंडे साहेब, एकनाथ खडसे यांना यांनीच संपवले. आमच्या पक्षातले लोकनेते अजित दादा भाजपसोबत गेले आहेत, त्यामुळे अजितदादांनाही संपवलं जाणार अशी भिती रोहित पवार यांनी व्यक्त करत कुटुंबातील व्यक्ती तिकडे गेल्याने भिती वाटतेय आणि वाईटही वाटते, अशी भूमिका मांडली.
हे वाचलं का?
भाजपने मुद्दामुन शिवसेना-राष्ट्रवादी फोडली. ही भाजपची रणनिती आहे. एक पक्ष दोन गटात फोडायचा, मग नंतर दोन गटात आरोप-प्रत्यारोप सुरु करायचे आणि स्वता: सेफ राहायचे अशी भाजपची रणनिती रोहित पवार यांनी सांगितली. यासोबत भाजपच्या या रणनीती विरोधात शरद पवार यांचा कसा लढा सुरु आहे,याची देखील रोहित पवार यांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024: मोदीच येणार, पण…; नव्या ETG सर्व्हेने भाजपचं वाढलं टेन्शन!
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आहेत. 60 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. भाजपचा जिकडे विचार संपतो, तिकडे शरद पवारांचा सुरू होतो. त्यामुळे शरद पवारांचा इतकंच मत आहे की, भाजपला जे हवंय, की आपण आपापसात भांडत राहिले पाहिजे. त्यांचे हे उद्दीष्ट साध्य करून द्यायचे नाही, हे आपले उद्दीष्ट आहे.आणि भाजपवर टीका करणे, भाजपची प्रवृत्ती सांगणे, भाजप महाराष्ट्राच्या अस्मितेला कशा प्रकारचा धक्का पोहोचवते? ही भूमिका सांगणे,अशी शरद पवारांची रणनिती रोहित पवार यांनी सांगितले.या भूमिके मागे दोन कारणे आहेत.एकतर भाजपची रणनिती पुढे चालू द्यायची नाही, आणि जे विचाराला पक्के राहिलेच नाही, त्याच्याबद्दल चर्चा करून वेळ का घालवायचा, असे देखील रोहित पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT