छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक, शिंदे सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
Maharashtra political news in marathi: छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारने अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेतले आहेत. पाहा कोणते आहेत हे निर्णय.
ADVERTISEMENT
Cabinet Meeting important decision: छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (16 सप्टेंबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिंचनासंबंधीचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (cabinet meeting in chhatrapati sambhajinagar shinde government took some important decision)
ADVERTISEMENT
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जसेच्या तसे:
- मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. 13 हजार 677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर .
- अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार
- छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना
- ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील 12 लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ.
- हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय. 485 कोटी खर्चास मान्यता
- राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना 85 हजार रुपये दरमहा मानधन. 12.85 कोटी खर्च
- सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार
- समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ.
- राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय.
- सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय
- परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
- परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
- परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार
- सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय
- नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
- धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा
- जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. 10 कोटीस मान्यता
- गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार
- राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान राबविणार
- 2005 पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि 2009 मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ
हे ही वाचा >> Eknath Khadse: ‘देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक छळ केला’, खडसेंचा खळबळजनक आरोप
दरम्यान, या बैठकीआधी छत्रपतीसंभाजीनगर महसुली विभाग आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही महसुली विभागांसह जिल्हा, तालुका, गावाचे नामकरणही करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT