Rajasthan : वसुंधरा राजेंना भाजपने शोधला पर्याय! कोण आहेत महाराणी दिया कुमारी?

भागवत हिरेकर

maharani diya kumari vs vasundhara raje scindia latest news : भाजपने आता वसुंधरा राजे यांचा पर्याय म्हणून महाराणी दिया कुमारी यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वसुंधरा राजेंचं राजकीय भवितव्य मावळताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

what are the reasons why the party can bet on Maharani Diya Kumari?
what are the reasons why the party can bet on Maharani Diya Kumari?
social share
google news

Vasundhara Raje Latest News : राजस्थान भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री वसुधरा राजे शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल शंका निर्माण होऊ लागल्यात. गेल्या काही दिवसांच्या घटनांवरून महाराणींचा राजकीय खेळ संपल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या जागी नवीन नेतृत्व तयार करण्याच्या मनस्थितीत पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत राज्यातील दोन महिला नेत्यांचे ज्या प्रकारे लक्ष वेधले गेले, ते वसुंधरा यांच्यासाठी संकेत होते का? दिया कुमारी वसुंधरा राजेंचा पर्याय बनू शकतील का? दिया कुमारीची राजस्थानमधील राजकीय ताकद किती आहे? (Will Diya Kumari be able to become Vasudhara’s alternative? What is Diya Kumari’s political power in Rajasthan?)

डिसेंबर 2018 मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह दिया कुमारी आणि त्यांच्या आई पद्मिनी देवी यांच्या जयपूर येथील निवासस्थानी पोहोचले होते. तेव्हापासून पक्षात राणींचे भविष्य उज्वल दिसत असल्याचे संकेत मिळू लागले. बुधवारी पंतप्रधान मोदींच्या भेटीचा मार्ग मोकळा झाला. महाराणी दिया कुमारींकडे लक्ष वेधले गेले, त्या शक्यतांना आणखी बळ मिळालं. मात्र, राजकीय विश्लेषक आधीच माध्यमांमध्ये अशा शक्यता वर्तवत होते. पण, महाराणी दिया कुमारी यांना भाजप ताकद देऊ शकते. त्याची नेमकी काय कारणं आहेत?

1) राजपूत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

आनंदपाल प्रकरणातील राजपूतांच्या नाराजीमुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अल्प मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यावेळी भाजपला ही चूक पुन्हा करायची नाही. त्यामुळे राजपूत व्होट बँक पुन्हा मजबूत होत आहे. विरोधी पक्षनेतेपदावर राजेंद्रसिंह राठोड यांची नियुक्ती करून भाजपने राजपूतांना आधीच संदेश दिला होता. वसुंधरापासून दुरावल्यानंतर भाजप आता राजस्थानमध्ये पक्षाचे संस्थापक आणि दिग्गज नेते भैरो सिंह शेखावत यांचा वारसा पुन्हा जिवंत करण्यात व्यस्त आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी हा त्याचा पुरावा आहे.

वास्तविक, राजस्थानमध्ये राजपूत 14 टक्के आहेत आणि 60 विधानसभा मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे. जयपूर, जालोर, जैसलमेर, बारमेर, कोटा, उदयपूर, चित्तोडगड, अजमेर, नागौर, जोधपूर, राजसमंद, पाली, बिकानेर आणि भिलवाडा या जिल्ह्यांतील राजपूत मतांची नाराजी कोणत्याही पक्षासाठी महागात पडणारी आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp