छ. संभाजीनगर: ‘त्या’ भागात 99 टक्के मुस्लिम समाज, हल्ला करणारे त्यांचेच लोक; कराडांचा मोठा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

A violent incident took place in Chhatrapati Sambhajinagar
A violent incident took place in Chhatrapati Sambhajinagar
social share
google news

Chhatrapati Sambhajinagar Violence

ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगर : राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) हिंसक घटना घडली. दोन समुदायातील तरुणाच्या गटात वाद होऊन परिस्थिती चिघळली. यावेळी दगडफेक आणि जाळपोळ असे प्रकार घडले. त्यामुळे रात्रभर शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र आता या हिंसक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. (Chhatrapati Sambhajinagar Violence Incident Minister Bhagwat Karad and MP Imtiaz Jaleel)

दरम्यान, आता या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ‘मुंबई तक’शी बोलताना हा हल्ला पूर्वनियोजीत आणि एमआयएम किंवा खासदार इम्तियाज जलील समर्थकांचा असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला. तर खासदार जलील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत मी दीड वाजता स्कुटर घेऊन रस्त्यावर होतो आणि त्यावेळी डॉ. कराड घरात झोपले होते, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

हे वाचलं का?

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार

काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

हल्ला पूर्ण नियोजीत आणि राजकीय रंग असण्याची शक्यता :

एकंदरीत हा हल्ला जर पाहिलं तर बरीचशी लोक आहेत काही लोकांनी डोक्याला आणि तोंडाला बांधून घेतलं आहे. सोबतच रात्री बारा एकच्या आसपास इतक्या लवकर इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमली त्यावरुन तो नियोजित आहे का काय असं वाटतो. या गोष्टीला राजकीय रंग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मागच्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमच्या माध्यमातून साखळी उपोषण चालू होतं. त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते, माजी खासदार ज्या पद्धतीने भाषणे करतात ते अत्यंत चुकीचे आहे. या शहरांमध्ये शांतता राबली पाहिजे शांततेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पण काही लोक मुद्दाम राजकारण करतात. माजी खासदार मधूनच काहीतरी बडबड करतात.

हल्ला करणारे मुस्लीम, मग मंदीरात जाऊन शांततेचं आवाहन करणं चुकीचं :

इम्तियाज जलील यांनी मंदीरात जाऊन शांततेच आवाहन केलं होतं. यावर बोलताना डॉ. कराड म्हणाले, चांगलंच आहे. पण ते देवळात कसे गेले हेच मला समजत नाही. त्यांना शांतता प्रस्थापित करायची होती तर त्यांनी त्या मॉबमध्ये जाणं गरजेचं होतं. कारण तो एरिया पूर्ण मुस्लीम बेल्ट आहे, तिथं शांत लोक आहेत तिथं जाऊन ते शांतता म्हणतायत. त्यांनी जर तिथं दंगल चालली होती तिथं शांततेचं आवाहन का केलं नाही त्यांनी? माझा जलील यांना प्रश्न आहे ती तुमची लोक होती तुम्हाला समर्थन करणारी लोक होती. मग तुम्ही त्यांना का शांत केलं नाही? भौगोलिक रचना बघितल्यास किराडपूरा हा मुस्लीम बेल्ट आहे. ९९ टक्के मुस्लीम समाज राहतो. त्यामुळे हल्ला करणारे लोक मुस्लीम समाजातील होते. त्यामुळे जलील यांना जर शांतात हवी होती तर त्यांना तिथं जाऊन शांततेचं आवाहन करणं गरजेचं होतं. उद्या जर हिंदू भागात काय घडलं तर हिंदू लोकांना शांत करणं ही माझी जबाबदारी आहे. इथे परिस्थिती वेगळी आहे. दुसऱ्या शहरांसारखी परिस्थिती नाही.

ADVERTISEMENT

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय-काय घडलं?

शांतात प्रस्थापित करण्यास प्राधान्य :

तरी आम्ही शांतता कमिटीची आज बैठक घेतलेली आहे. शहरामध्ये शांतता म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलवलं होतं. सर्व राजकीय नेत्यांना बोलवलं आहे. एकंदरीत राम नवमी हिंदू बांधवांनी शहरात उत्साहात साजरा करावी, संध्याकाळी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये शांततेत सामील व्हावं. त्याचबरोबर पोलीस आयुक्त, पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व हल्लेखोरांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यांना पकडले पाहिजे आणि कठोर कारवाई करावी झाली पाहिजे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले इम्तियाज जलील?

या हल्ल्याला एमआयएम किंवा खासदार जलील समर्थक जबाबदार आहेत का?

यावर बोलताना ते म्हणाले, मी सगळ्यांचा खासदार आहे. कोणा एका समाजाचा खासदार नाही. या जिल्ह्यात राहणारे हिंदू, मुस्लीम यांचा खासदार आहे. त्यामुळे यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. सध्या शहराला कसं शांत करता येईल ही आपली जबाबदारी हवी. आज राम नवमी सुरु आहे, रमजानचा महिना आहे. हे सण उत्साहात झाले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. भाजप आणि एमआयएमची मिलीभगत असल्याचा चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांवर बोलताना खासदार जलील म्हणाले, सर्व पक्षांनाच माझी विनंती आहे की संयमाने बोलावं. काही पुरावे असतील तर ते सादर करावेत.

नामांतरावरील भूमिका आणि आंदोलनाचा हा हल्ला परिपाक आहे का?

यावर खासदार जलील म्हणाले, १४ दिवस लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन चालले. मोठा कॅन्डल मार्च काढला, या सगळ्यात एक छोटीशीही अप्रिय घटना घडली नाही. त्यानंतर हिंदू जागृती समितीच्या लोकांना हात जोडून विनंती केली होती, की हा शहरापुरता मर्यादित मुद्दा आहे, तुम्ही बाहरेच्या लोकांना बोलवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करु नका. तरीही त्यांनी तेलंगणाच्या आमदारांना बोलावलं. एका चॅनेलच्या संपादकाला बोलावलं. त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केली, भाषा वापरली त्यामुळे शहरातील वातावरण खराब झालं. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या दोन मंत्र्यांच्या सभेत तोडफोड झाली. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यानंतर आता तुम्ही जलीलवर गु्न्हा दाखल करत आहात? या दोन मंत्र्यांसाठी काही वेगळा नियम आहे का? हा दुजाभाव कशासाठी?

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar : हिंसाचार करणारे सीसीटीव्हीत कैद, 6 CCTV फुटेज समोर

खासदार जलील मंदीरामध्ये का गेले?

मी उलट त्यांना हा सांगतो की, ज्यावेळी खासदार जलील यांनी निश्चय केला ही मंदीराला कोणालाही हात लावून देणार नाही. त्यावेळी कराड साहेब झोपले होते. तुम्ही सकाळी सकाळी येता आणि अशा प्रकारचे वक्तव्य करता? लाज वाटत नाही का? इम्तियाज जलील रात्री दीड वाजता तिकडे स्कुटरवरुन गेला आणि कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तरीही तुम्ही अशा प्रकारचे आरोप करता? मी तीन तास मंदीरामध्ये ठाण मांडून बसलो होतो. तिथल्या सगळ्यांनी मान्यही केलं की आज जर खासदार साहेब नसते तर आमची काय अवस्था झाली असती. दंगा झाल्याच कळाल्यानंतर तिथं फक्त १५ ते १७ पोलीस आले होते? कुठे गेले एवढी मोठी फौज? का दोन तास लागले त्यांना यायला? हे सगळे प्रश्न होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT