Ajit Pawar यांनी खर्च काढताचं CM शिंदेंनी दाखवला आरसा, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Eknath Shinde Vs Ajit Pawar :

ADVERTISEMENT

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री असताना २४५ कोटींचं नियोजन त्यांच्या जाहिरांतीसाठी केलं होतं. त्यांच्या सोशल मीडियासाठी एका वर्षांत ६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण विरोध झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. स्वतःचा प्रचार करायला सहा कोटी रुपये? माझं कुटुंब, माझी जबाबदारी, यावर किती खर्च केले त्यांनी? असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी अजित पवार यांच्या टिकेवर प्रतिप्रश्न केला. (CM Ekanth shinde Replied to Ajit Pawar on advertisement expenditure)

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (२७ फेब्रुवारी) पासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी ते बोलतं होते.

हे वाचलं का?

चहामध्ये सोन्याचं पाणी घालता का? अजित पवारांचा शिंदेंना संतप्त सवाल

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनीही मोठी जाहिरात केली होती. त्या तुलनेत आम्ही कमी खर्च केले आहेत. ७ महिन्यात फक्त ५० कोटी जाहीरातींवर खर्च केले. पण दिल्ली, पंजाब, तेलंगना ही राज्य किती जाहिराती देत आहेत, त्याचा हिशेब करा. त्या तुलनेत महाराष्ट्र काहीच खर्च करत नाही. लोकांपर्यंत काम पोहोचवणे चुकीचे आहे का?” असा सवाल यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

वर्षावरील खर्चावर काय म्हणाले शिंदे?

ADVERTISEMENT

वर्षा बंगला अडीच वर्षांपासून बंद होतं. आता सहा-सात महिन्यांपासून लोकं वर्षावर येत आहेत. आल्यानंतर लोकांना चहा-पाणी द्यायचं नाही का? आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालत नाही. पण चहापाणी देऊ शकत नाही का? तुम्ही ७० हजार कोटी सिंचनासाठी पाण्यात घातले. तरीही शून्य पॉईंट जमीन सिंचनाखाली आली नाही. हे मी म्हणत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण आणि कॅगने म्हटलं आहे. शेवटी त्याचाही हिशेब द्यावा लागेल. कुठे घसरता याचा विचार करा? सात महिन्यात महिन्याला ४० लाखांचा खर्च झाला. ज्यावेळी फेसबुक लाईव्ह सुरु होतं, तेव्हा वर्षा बंगल्याचा महिन्याचा खर्च तीस ते पस्तीस लाख होता. ही माहिती अजित पवारांनी घ्यायला हवी होती, असंही शिंदे म्हणाले.

Manish Sisodia : ठाकरेंच्या भेटीनंतर २४ तासांत केजरीवालांच्या सहकाऱ्याला अटक

त्यांच्यासोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली :

हसिना पार्करला चेक दिलेल्या नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची धमक नव्हती, बरं झालं, त्यांचे साथीदार अजित पवार आहेत आणि त्यांच्यासोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांची परिस्थिती मी समजू शकतो. अनेक वर्ष सत्तेमध्ये राहून बाहेर गेल्यानंतर मासा पाण्याविना तडफडतो तशी त्यांची अवस्था झाली आहे. केवळ आरोप करण्याचं काम त्यांनी सुरु केलं आहे, असही शिंदे यांनी पवारांना सुनावलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

लोकायुक्त विधेयक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाईल. विधानपरिषदेत पुरेसं संख्याबळ नाही. मात्र आम्ही सर्व पक्षांना हे विधेयक सहमतीने मंजूर करण्याचे आवाहन करतो. ८ मार्चला आर्थिक सर्वेक्षण/पाहणी अहवाल सादर होईल. तर ९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

किती काळ गप्प बसणार? ठाकरेंना सवाल

यावेळी फडणवीस यांनी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.ते म्हणाले, वीर सावरकरांचा स्मृतीदिन आहे आणि आज खुद्द राहुल गांधींनी वीर सावरकरांचा अवमान केला आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो की, त्यांच्यासोबत सरकार असताना त्यांनी मौन बाळगले, पण वीर सावरकरांच्या अपमानावर तुम्ही किती काळ गप्प बसणार?

टोमॅटो विक्रेत्या शेतकऱ्याला चेक देणाऱ्या विक्रेत्याचा परवाना निलंबित :

टोमॅटो विकणाऱ्या शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक मिळाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. वास्तविक यात इलेक्ट्रॉनिक बिलिंग प्रणालीनुसार वाहतूक खर्च वजा करण्यात आला होता. परंतु असा वाहतूक खर्च वजा करता येणार नाही, असा सरकार आदेश आहे. यात खर्च वजा करुन चेक दिल्याने संबंधित सूर्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT