राहुल गांधी बनणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, INDIA ब्लॉक बैठकीत निर्णय
leader of opposition Rahul Gandhi: राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या बैठकीत नेमकं काय ठरलं
ADVERTISEMENT

Rahul Gandhi leader of opposition: नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या राजधानी दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी इंडिया ब्लॉकची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बैठकीत झालेल्या या निर्णयाची माहिती प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब यांना पत्र लिहून देण्यात आली आहे.
मंगळवारी (२५ जून) रात्री खरगे यांच्या घरी झालेल्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीनंतर माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, 'या बैठकीत राहुल गांधी यांना सभागृहात विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीपीपी अध्यक्षांनी प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब यांना पत्र लिहून लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे.'
CWC बैठकीत हा प्रस्ताव करण्यात आला मंजूर
अलीकडेच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याची एकमुखी मागणी करण्यात आली होती. बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी राहुल गांधी यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असा ठराव मंजूर केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना यावर विचार करण्यासाठी काही वेळ मागितला होता.
हे ही वाचा>> 'शिवसेनेसोबत आपल्याला..', राहुल गांधींच मोठं विधान; Inside Story
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या सुरुवातीच्या भाषणात म्हटले की, 'मी तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो की, भारत जोडो यात्रा जिथे जिथे गेली तिथे तिथे काँग्रेस पक्षाच्या मतांची टक्केवारी आणि जागांची संख्या वाढली आहे.'