Ram Mandir: सोनिया गांधी राम मंदिरात जाणार की नाही?, जाहीर केला मोठा निर्णय
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनची जोरदार तयारी केली जात असतानाच आणि काही जणांना निमंत्रण पत्रिका दिलेली असतानाही उद्घाटनाला जाणार नसल्याचे काँग्रेसकडू स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

Congress Leader : गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची अयोध्येबरोबरच (Ayodhya) देशात जोरदार तयारी सुरु आहे. या कार्यक्रमासाठी अनेकांना निमंत्रण पत्रिकाही (invitation card) पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यावरून देशातील राजकारण तापले आहे. तर आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे काँग्रेसला (Congress) मिळालेले निमंत्रण काँग्रेसकडून नाकारण्यात आले आहे. काँग्रेसकडून निवेदन काढून याची माहिती देण्यात आली आहे.
निमंत्रण नाकारले
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मिळालेले निमंत्रण काँग्रेसकडून सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
हे ही वाचा >>MLA Disqualification: CM शिंदेंविरोधात निकाल गेला तर.. असं बदलेल महाराष्ट्राचं राजकारण
काँग्रेसचा थेट आरोप
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन काढून सांगितले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र आपल्या देशात लाखो लोक रामाची पूजा करतात, त्यामुळे धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे. तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने मात्र या कार्यक्रमाचा राजकीय कार्यक्रम राबवला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
मंदिर अजूनही अपूर्ण
यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, राम मंदिराचे बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. तरीही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी मंदिराचे उद्घाटन केले जात आहे. 2019 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आणि प्रभू रामाचा आदर राखून काँग्रेसच्या, मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांना मिळालेले निमंत्रण आदरपूर्वक नाकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.