Datta Dalvi : ठाकरेंच्या नेत्याला जामीन, शिंदेंवर बोलण्यास बंदी, कोर्टाने घातल्या 5 अटी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

datta dalvi granted bail thackeray leader in case abusing cm eknath shinde shivsena ubt
datta dalvi granted bail thackeray leader in case abusing cm eknath shinde shivsena ubt
social share
google news

Datta Dalvi Granted Bail : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर आता दत्ता दळवी यांना मुलुंड कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रूपयाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्यास बंदी घातली आहे, तसेच कोर्टाने काही अटी देखील ठेवल्या आहेत. (datta dalvi granted bail thackeray leader in case abusing cm eknath shinde shiv sena ubt)

दत्ता दळवी यांच्या जामीनासाठी आज मुलुंड कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोणत्याही समाज आणि समूहाविरोधात दत्ता दळवी यांनी अवमानकारक वक्तव्य न केल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत हेट स्पीच केल्याचीही नोंद घेतली.

 हे ही वाचा : Rule Change : 1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलले, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम ?

या सुनावणीत 41A ची नोटिस न देता दत्ता दळवी यांना अटक केल्याचा दावा दत्ता दळवी यांचे वकिल संदीप सिंग यांच्या वकिलाने केला. पोलीसांनी सेक्शन 153 गैरलागू केल्याचंही दळवींच्या वकिलाने म्हटले. पण दळवी यांच्या वकिलाने केलेला दावा या स्टेजवर मान्य होऊ शकत नाही, असं कोर्टानं निरिक्षण नोंदवलं आहे. तसेच दत्ता दळवी यांच्या जामीनास मुंबई पोलिसानी सक्त विरोध केला होता. मात्र अखेर मुलुंड कोर्टाने दत्ता दळवी यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता ते तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दत्ता दळवींसमोर ‘या’ अटी ठेवल्या

दत्ता दळवींना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी ठेवल्या आहेत. या केसचा तपास संपेपर्यंत दळवींवर काही प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोणतेही अवमानकारक वक्यव्य करण्यास कोर्टाने मनाई केली आहे. कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दत्ता दळवी यांना पोलिसांना सहकार्य करण बंधनकारक असणार आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेणं बंधनकारक असल्याचे कोर्टाने दत्ता दळवींना जामीन देताना म्हटले आहे.

 हे ही वाचा : Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, सुर्या-राहुलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

दत्ता दळवींचे विधान काय?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते दत्ता दळवी मेळाव्यात बोलताना म्हणाले होते की, “आज मिंधे गट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. “मला वाटतं आज कदाचित दिघे साहेब असते ना, तर मी सांगतो या एकनाथ शिंदेला चाबकाने फोडुन काढलं असतं. आम्ही सगळं बघितलेले आहे.”

ADVERTISEMENT

“एकनाथ शिंदे काय होता? एकनाथ बिंदे होता कुठे, काय करत होता; हे आम्ही स्वतः बघितलेले आहे. समजलं का मी स्वतः बघितलेले आहे. परतु बाळसाहेबांच्या जवळ आला. बाळासाहेबांनी आशिर्वाद दिले. उद्धवजींच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. पक्षाशी गद्दारी केली”, अशी टीका दत्ता दळवींनी केली होती. “नाव बाळासाहेबांचं वापरायचे. आता ते हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे #@डीच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?”, अशी टीका दत्ता दळवींनी शिंदेंवर टीका केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT