Vijay Wadettiwar on Ajit Pawar : ‘अजितदादा इकडेही उपमुख्यमंत्री अन् तिकडेही…’; वडेट्टीवारांचा टोला…
Vijay Wadettiwar on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या पक्षांतराविषयी बोलताना त्यांनी ईडी कारवाईवरून त्यांना छेडले आहे.
ADVERTISEMENT
Vijay Wadettiwar on Ajit Pawar : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ मोठ्या घटना घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगीही होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) आपल्या आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यापासून आता कधी काळी त्यांच्यासोबत सहकारी असलेल्या काँग्रेसकडूनही (Congress) त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. त्यातच अजित पवार यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. त्यावरूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar came to power BJP avoid ED action Vijay Wadettiwar criticizes)
ADVERTISEMENT
या ‘ईडी’मुळे पक्षांतर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा चालू असल्याने त्यावरून आता विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या टीका केली आहे. त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, कालच्या सभेत त्यांनी मी सत्तेसाठी गेलो नाही हे ते सांगतात ते खरंही आहे. कारण ते सत्तेसाठी नाही तर ईडीमुळे गेले आहेत. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या ‘ईडी’मुळे गेले असावे असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
हे ही वाचा >> Sanjay Raut on Nitin Desai: ‘सनी देओलचं घर वाचलं, मग नितीन देसाईंचा…’, राऊतांचा घणाघात
सत्ता किती महत्वाची
तसेच त्यांनी ईडीचा अर्थ वेगळा लावला असवा म्हणून ते तिकडे गेले असावेत असं म्हणत त्यांनी सत्ता किती महत्वाची आहे हे अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागावरून वाटत असंही त्यांनी त्यांना म्हटले आहे.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री झालो असतो
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मला वाटतं सत्ता ही सर्वोच्च समजूनच हा सगळा निर्णय झाला असावा. कारण मुळात ते एकीकडे असे म्हणतात आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता त्यावेळेसच मी मुख्यमंत्री झालो असतो असंही ते सांगतात त्यामुळे त्याचा नेमका काय अर्थ काढायाच ? त्यांना पदाची ईच्छा आहे, त्याचबरोबर त्यांना मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी गेले असते तर समजू शकलो असतो. मात्र इकडून तिकडे जाऊन उपमुख्यमंत्री तिकडून इकडे येऊन पुन्हा उपमुख्यमंत्री त्या पदासाठी नाही तर ते कशासाठी गेले? असा सवाल करुन अजित पवार हे भाजपसोबत का गेले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे अशा खोचक शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
हे ही वाचा >> MNS Jagar Padyatra: अमित ठाकरे म्हणाले पुढच्या वर्षी राज ठाकरेंची सत्ता येईल, तेव्हा…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT