‘…म्हणून शरद पवार अस्वस्थ’, ‘त्या’ घटनेवर फडणवीसांनी काय दिलं उत्तर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis again criticize sharad pawar maharashtra politics
devendra fadnavis again criticize sharad pawar maharashtra politics
social share
google news

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे. देवेंद्र फडणवीसांनी रविवारी चंद्रपुरात पवार साहेबांना मुत्सद्देगिरीवरून टोला लगावल्यानंतर शरद पवार यांनी सगळा इतिहास सांगून फडणवीसांना डिवचलं होते. त्यात आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. पवार साहेबांनी एकतर माझे भाषण ऐकले नाही, आणि ऐकले असेल तर त्यांना ते अस्वस्थ करणारे होते, म्हणूनच त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. (devendra fadnavis again criticize sharad pawar on  maharashtra politics)

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा तो किस्सा सांगितला. 1978 साली पवार साहेब वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि जनसंघासोबत सरकार तयार केले. आता एकनाथराव शिंदे हे तर आमच्याच सोबत निवडून आले होते. ते 50 लोकं घेऊन बाहेर पडले आणि आमच्या सोबत सरकार तयार केले. मग पवार साहेबांनी तयार केलेले सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदे यांनी तयार केलेले सरकार ही बेईमानी कसे होऊ शकते? असा पुन्हा एकदा पुनरूच्चार देवेंद्र फडणवीसांनी केला.

हे ही वाचा : BJP : “पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार, हे बावनकुळेंना माहितीये”

तसेच पवार साहेब म्हणाले हे खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. पण मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो. याने इतिहास बदलत नाही. कोण जन्माला आले, कधी आले याच्यावर इतिहास बदलत नसतो, असा टोला देखील फडणवीसांनी शरद पवारांना लगावला. इतिहासात लिहून ठेवले आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. आणि ते बाहेर पडून भाजपसोबत म्हणजे तेव्हाच्या जनसंघासोबत सरकार तयार केले. तेच मी सांगितले, असे देखील फडणवीसांनी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांचे फडणवीसांना उत्तर…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी केली तर गद्दारी आणि पवारांनी केली तर मुत्सद्देगिरी.” या विधानाला शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “कधी केली? त्यांनी सांगावं कधी केली? 1977 साली आम्ही सरकार बनवलं, पण त्यामध्ये भाजप माझ्याबरोबर होता. उत्तमराव पाटील… ही लहान (देवेंद्र फडणवीस) मुलं होती त्यावेळी. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल. पण, त्यांच्या माहितीसाठी सांगतो. मी जे सरकार बनवलं, ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं. त्याच्यामध्ये त्यावेळचा जनसंघ. त्याचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्याच्या नंतर आडवाणी होते. आणखी काही सदस्य होते.” “मला वाटतं की, हे (देवेंद्र फडणवीस) प्राथमिक शाळेत कदाचित असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील फारशी माहिती नसेल. आणि त्या अज्ञानापोटी ते असे स्टेटमेंट करतात. यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही”, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT