शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?
भाजप आणि राष्ट्रवादी युतीसाठी शरद पवारांनी सुरवातीला ग्रीन सिग्नल दिला. पण तीनचार दिवसांआधी नकार कळवल्याचा दावा फडणवीसांनी केला. पहिल्यांदाच पवारांच्या या कथित रोलबद्दलची माहिती समोर आलीय.
ADVERTISEMENT

Maharashtra political latest news : देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनं पुन्हा खळबळ उडवून दिलीय. शरद पवारांनी टाकलेल्या ट्रॅपमध्ये फडणवीसांचा गेम झाल्याची माहिती समोर आलीय. स्वतः फडणवीसांनीच याबद्दलचे गौप्यस्फोट केल्यानं खळबळ उडालीय. पहाटेच्या शपथविधीबद्दल पवारांचा डबलगेम काय, त्यात ठाकरेंचा रोल काय आणि फडणवीस कसे सापडले हेच समजून घ्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल अनेक नवे गौप्यस्फोट केलेत.
ठाकरेंनी सोडली साथ, फडणवीसांचे गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी युती तोडून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोन घेणंही बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर आम्ही दुसरे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही भाजपाबरोबर येऊ शकतो.”
हेही वाचा >> ‘एकनाथ शिंदे माझे ‘बॉस’, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण ठरवणार?
फडणवीसांनी पुढे सांगितलं की, “यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीतच महाराष्ट्रात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी या सरकारचं नेतृत्व करणार, असंही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली”, असा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.