Devendra Fadnavis: सत्ताधाऱ्यांसोबत बसलेल्या नवाब मलिकांवर फडणवीसांनी केलेले ‘हे’ आरोप, अन् आज..

रोहित गोळे

ADVERTISEMENT

devendra fadnavis made serious allegations against nawab malik what did he suggest to ajit pawar by writing an open letter ncp bjp
devendra fadnavis made serious allegations against nawab malik what did he suggest to ajit pawar by writing an open letter ncp bjp
social share
google news

Devendra Fadnavis serious allegations against Nawab Malik: मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ही सतत बदलत आहेत. त्यातच आज (7 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसल्याने नवा ड्रामा पाहायला मिळाला. अशावेळी सुरुवातीला काहीशी पाठराखण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या काही तासातच ‘लेटर बॉम्ब’ फोडत मलिकांची चांगलीच कोंडी केली आहे. (devendra fadnavis made serious allegations against nawab malik what did he suggest to ajit pawar by writing an open letter ncp bjp )

ADVERTISEMENT

मलिक विरुद्ध फडणवीस हा वाद काही नवा नाही.. महाविकास आघाडी सरकार असल्यापासून हा वाद सुरू होता. ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप एकमेकांवर केले होते. पण त्याची नेमकी सुरुवात कशी झाली होती आणि त्याचा नेमका शेवट कसा झाला हेच आपण सविस्तरपणे पाहूया.

कॉर्डिलिया ड्रग्स केस प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. त्यानंतर बरेच दिवस हे प्रकरण सुरू होतं. पण हळूहळू या मुद्द्यांवरून मलिकांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर आरोपाला सुरुवात केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Nawab Malik: ‘सरडा, आत्महत्या.. सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ एका विधानाने.. फडणवीस सापडले कोंडीत?

याची सुरुवात त्यांनी फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या एका गाण्याच्या अल्बमला केलेल्या फायनान्सवरून झाली होती.

अमृता फडणवीसांच्या अल्बमवरून मलिकांनी केलेले आरोप..

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी जे गाणं केलं होतं त्यावर आक्षेप घेतले होते. ‘त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत. फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहतो. ज्याला भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे’, असा खळबळजनक आरोप मलिकांनी केले होते.

ADVERTISEMENT

फडणवीसांनी काय दिलेलं स्पष्टीकरण

‘ही संघटना नदी पुनरुज्जीवनासाठी काम करते. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलो होतो. त्यावेळी हे फोटो काढलेले आहेत. सगळ्यांसोबत फोटो काढलेले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. यापाठीमागे त्यांची मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे. यासंदर्भात रिव्हर मार्चवाल्यांनीच त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते लोक रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले होते. त्यांच्याशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही’, असं फडणवीसांनी स्पष्टीकरण त्यावेळी दिलं होतं.

ADVERTISEMENT

नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींशी व्यवहार केल्याचा गंभीर आरोप

दरम्यान, नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेल्या असताना काही दिवसाताच एक असं प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलं की, त्यामुळे नवाब मलिक हे पूर्णपणे कायद्याच्या कचाट्यात अडकले. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी नेमके काय आरोप केले होते हे ही आपण पाहूयात.

‘मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे.’ असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

‘स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे.’ असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं.

‘2005 मध्ये जो व्यवहार झाला त्यावेळी तिथला दर काय होता? तर त्याच्या मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर 415 रूपये स्क्वेअर फूटने जागा घेतली ती मलिक कुटुंबाने घेतली होती. याच रोडवर एक जागा 2005 मध्ये एक जागा 2 हजार रूपये स्क्वेअर फूटने विकत घेतली आहे. सॉलिडसने याच वर्षी दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जमीन 25 रूपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रूपये चौ. फुटाने घेतली असून 15 रूपये चौ. फुटाने पैसे दिले आहेत. आता प्रश्न हा आहे की मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन का विकत घेतली गेली?’ असा गंभीर सवालही फडणवीसांनी त्यावेळी विचारला होता.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: ‘सत्ता येते आणि जाते, पण…’, फडणवीसांचं अजितदादांना खुलं पत्र, महाराष्ट्रात मोठी खळबळ!

‘बॉम्बस्फोटात आपण माणसांची लक्तरं पाहिली त्याचं प्लानिंग करणारा हा शाहवली खान. भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद आहे. त्याची बहीण हसीना पारकर आणि तिचा फ्रंट मॅन खान यांच्याशी मलिक यांनी व्यवहार का केला? या दोघांनी तुम्हाला ही जमीन इतक्या स्वस्तात कवडी मोलाने का विकली? आपली संपत्ती सरकारजमा होऊ नये म्हणून विकली गेली. खरंच हा व्यवहार एवढाच झाला की काळा पैसा यात वापरला गेला?’ असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला होता.

‘सरदार शाहवली खान हे 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शाहवली खान टायगर मेमनच्या ट्रेनिंगमध्ये होते. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिका याची रेकी त्याने केली होती. बॉम्बस्फोट होणार आहेत ही सगळी माहिती खान याच्याकडे होती. ज्या अल हुसैनी इमारतीत कारमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं त्यामध्ये याचा सहभाग होता.’ असाही आरोप फडणवीस यांनी केला होता.

‘सलीम पटेल याने 2013 किंवा 2014 हे वर्ष असेल. सलीम पटेल हा तोच व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर. आर पाटील यांच्यासोबत आला होता आणि दाऊदसोबत फोटो आला म्हणून आर आर पाटील यांना टीका सहन करावी लागली. हसीनाआपाचा म्हणजेच दाऊदच्या बहिणीचा हा ड्रायव्हर आहे. दाऊद पळून गेल्यानंतर जमिनीचे जे व्यवहार व्हायचे त्यात ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार होत असत तो हा सलीम पटेल आहे असंही आज फडणवीसांनी सांगितलं. माझ्याकडे पाच प्रॉपर्टीजचे डिटेल्स आहेत. त्यातल्या एका प्रॉपर्टीचे डिटेल्स मी तुम्हाला देतो आहे. उरलेल्या चारमध्येही अंडरवर्ल्डचा संबंध आहे.’ असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, या आरोपांसोबतच फडणवीसांनी मलिकांविरोधात काही कागदपत्रंही सादर केली होती. त्यानंतर नवाब मलिक हे मंत्रिपदावर असतानाच त्यांच्याविरोधात ईडीने अटकेची कारवाई केली होती. त्यामुळे त्यांना अनेक महिने तुरुंगात काढावे लागले होते.

मात्र हेच नवाब मलिक आज जेव्हा सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले तेव्हा विरोधकांनी फडणवीसांना बरंच घेरलं. अखेर मलिकांना आपल्यासोबत घेऊ नका अशी सूचनाच फडणवीसांनी अजित पवार यांना केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT