BJP : लोकसभेला भाजप किती जागा लढणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करु शकतात अशी जनतेला खात्री असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. देशाची सुत्र पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात द्यायची आहे.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis On Lok Sabha Election : देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात,अशी जनतेला खात्री आहे. त्यामुळे देशाची सुत्र पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात द्यायची आहे. यासाठी पुढचे 9 ते 10 महिने पूर्ण वेळ आपण पक्षासाठी देणं गरजेचं असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे. यासोबत त्यांनी आगामी लोकसभा (Lok Sabha Election) आणि विधानसभा निवडणूकीबाबतची (Vidhan Sabha Election) रणनितीच सांगितली आहे. (devendra fadnavis statement on lok sabha and vidhan sabha election strategy mahayuti government maharashtra politics)
ADVERTISEMENT
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपुर्ण बैठक नागपूरातील कोराडी येथे पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देंवेंद्र फडणवीस बोलत होते. देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करु शकतात अशी जनतेला खात्री असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. देशाची सुत्र पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात द्यायची आहे. त्यामुळं पुढचे 9 ते 10 महिने पूर्ण वेळ आपण पक्षासाठी देणं गरजेचं असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या आपण किती जागा लढवणार याची चर्चा सुरु आहे. पण तुम्ही काळजी करु नका तुमच्या मनात जेवढ्या जागा तेवढ्या जागा आपल्या मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : Crime: मुरबाडमध्ये माजी सभापतीने तरुणाचे दोन्ही हातच छाटले, पंजाही कापून फेकला!
आपल्यात तीन राज्यांचा विजयाचा उत्साह आहे. त्यामुळे आपण लोकसभेसह विधानसभेच्या निवडणूकाही महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढणार आहोत, अशी घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली. महाविजय 2024 अभियान आपण सुरू केलं आहे. या अभियानाच्या दृष्टीने आपण खालपर्यंत संघटनेची रचना तयार केली आहे. तसेच आपला विजय होणार असला तरी गाफील ऱाहू नका, असा कानमंत्रही फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Thane: MSRDC च्या संचालकाच्या मुलाचं भयंकर कृत्य, गर्लफ्रेंडला कारने चिरडल्याचा आरोप
मोदींच आकर्षण फक्त हिंदी भाषिक राज्यातील लोकांना आहे. मात्र हे खोटं आहे. महाराष्ट्रातील जनतेला मोदींच आकर्षण नसतं तर लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये आपण 42 जागा जिंकू शकलो नसतो. यातील काही अशा जागा आपण जिंकल्या की ज्याचा आपण विचारही केला नव्हता,असे फडणवीसांनी म्हटले.
शरद पवारांवर टीका
मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळेंच वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल तर, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? त्याच्याही पेक्षा मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत, असे सुप्रिया सुळेंचं त्यावेळचं व्यक्तव्य असल्याचे फडणवीसांनी सांगत त्यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
त्यांच्या (पवारांच्या) मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला, त्यावेळेसच देता आले असते. त्यांच्या मनात असतं तर वेगवेगळ निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले, त्यावेळी कोण कुठल्या यादीत आहेत, कुणी विचारतही नव्हते, तेव्हा देता आले असते. पण त्यांना कधीच द्यायचच नव्हत, त्यांना समाज-समाजाला झुंजवत ठेवायचं होतं , त्यांचे राजकारण कसे आहे, लोक झुंजत राहिली तर आपले नेतेपद कायम राहिल, ही त्यांची मानसिकता आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT