Ajit Pawar: 'अमित शाहांच्या सांगण्यावरून सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं?', ऐका अजितदादांचं उत्तर
Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता याबाबत अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT

Ajit Pawar India Today Conclave: मुंबई: इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. पण याचवेळी त्यांना एक असा प्रश्न विचारण्यात आला की, ज्यावर सर्वांचीच उत्सुकता बरीच ताणली गेली. (did sunetra pawar stand against supriya sule on amit shah orders know ajit pawar answer)
लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता? याबाबत अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं आहे. पाहा अजित पवार याबाबत नेमकं काय म्हणाले.
अजित पवारांचं 'त्या' प्रश्नावर थेट उत्तर
प्रश्न: सुप्रिया सुळेंविरोधात तुम्हाला सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करावं लागेल हे तुम्हाला अमित शाह यांनी सांगितलं होतं का?
अजित पवार: मला अजिबात कोणीही सांगितलं नव्हतं. पहिलेच मी तुम्हाला सांगितलं आहे. मी कोणाचं ऐकत नाही.. माझ्या मनात जे येईल ते मी करतो. अमित शाह किंवा कोणीही मला सांगितलं नव्हतं. जेव्हा लोकसभेचा निकाल आणि काही दिवस उलटले तेव्हा माझ्या मनात आलं की, मी जो निर्णय घेतला होता तो चुकीचा होता.