‘तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं, तर माझ्या आयुष्याचं विमान..’, खडसेंचा CM शिंदेंना फोन

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

eknath khadse call cm eknath shinde after successful operation of angioplasty and wish diwali 2023
eknath khadse call cm eknath shinde after successful operation of angioplasty and wish diwali 2023
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना गेल्या रविवारी (५ नोव्हेंबरला) छातीत दुखत असल्याने तातडीने जळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आले. आता एकनाथ खडसे यांची प्रकृती सुधारली आहे. त्यानंतर खडसे यांनी तो जीवघेणा सांगितला आहे. इतकंच नाही तर एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार देखील मानले आहेत. (eknath khadse call cm eknath shinde after successful operation of angioplasty and wish diwali 2023)

ADVERTISEMENT

एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखु लागल्याचे कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्स;r व्यवस्था केली होती. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्याशी संपर्क केला होता. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे जळगाववरून खडसे यांना मुंबईत हलवण्यात आले होते. आता खडसे यांच्यावर मुंबईत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

हे ही वाचा : PF interest : पीएफ धारकांना दिवाळी भेट! खात्यावरील व्याजासंदर्भात सरकारने दिली मोठी अपडेट

मला एअर अँब्युलन्स मिळत नव्हती. एक मिळाली ती नाशिकला उभीही होती. मात्र एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळे मिळालं. मी रुग्णालयात आलो. ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेलं तेव्हा अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. दोन ब्लॉकेज 100 टक्के आणि तिसरा 70 टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. पण त्यांनी अँजिओप्लास्टी केली. ती व्यवस्थित पार पडली.

हे वाचलं का?

कार्डिअॅक अरेस्ट आला.. माझं हृदय 100 टक्के बंद पडलं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रिटमेंट दिली. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं आणि लँड झालंच नसतं. तुमचे आभार. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!” असं एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनवर म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Narak Chaturdashi 2023 : 11 की 12 नोव्हेंबर, नेमकी दिवाळी कधी? मुहूर्त, पूजा विधी एका क्लिकवर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT