Maharashra Politics : शिंदे दक्ष आता लोकसभा निवडणुकीवर लक्ष! कधी, कुठे असणार दौरा?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Eknath shinde, party chief of Shiv sena will start lok sabha election campaign from january 6
Eknath shinde, party chief of Shiv sena will start lok sabha election campaign from january 6
social share
google news

Eknath shinde Lok Sabha Election 2024 Maharashtra : मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसंकल्प अभियान राज्यभरात होणार आहे. यानिमित्ताने कार्यकर्ते मेळावे होणार आहे. या मेळाव्यांच्या निमित्ताने शिंदे महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश शिंदेंनी दिले. जानेवारी महिन्यात शिंदे राज्यभर फिरणार असून, दौऱ्यांच्या तारखा आणि ठिकाणं समोर आली आहेत.

एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली 28 डिसेंबर रोजी मुंबई बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना एकनाथ शिंदेंनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल. आपल्या हातात 60 दिवसच आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा”, असे आदेश शिंदेंनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा >> खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?

महायुतीचं जागावाटप अद्याप झालेलं नाही. त्यामुळे कोणती जागा कोणत्या पक्षाला जाणार याबद्दल शिवसेनेत अस्वस्थता आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. “महायुती म्हणून ताकदीने लढा. कुठली जागा गेली आणि कुठली हे डोक्यात ठेवू नका. आपल्याला 48 जागा लढून महायुती म्हणून जिंकायचं आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरेंकडे उमेदवारच कुठेय? काँग्रेस नेत्याचा पवारांनाही सल्ला

शिवसंकल्प अभियान- कार्यकर्ता मेळावा

मुख्यमंत्री येत्या ६ जानेवारीपासून सुरु करणार महाराष्ट्र दौरा

6 जानेवारी यवतमाळ-वाशिम आणि रामटेकमध्ये मेळावा.

ADVERTISEMENT

8 जानेवारी अमरावती आणि बुलढाणा येथे मेळावा.

ADVERTISEMENT

10 जानेवारी हिंगोली आणि धाराशीवमध्ये कार्यकर्ता मेळावा.

11 जानेवारी परभणी आणि संभाजीनगर.

21 जानेवारी शिरूर आणि मावळ.

24 जानेवारी रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग.

25 जानेवारी शिर्डी आणि नाशिक.

29 कोल्हापूर.

30 जानेवारी हातकंणगले.

त्यानंतर दोन दिवसाचं शिवसेनेचे शिबिर कोल्हापूरला होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT