माईक बंद पडला, परभणीच्या मेळाव्यात शिंदेंनी भाषण सोडलं! पाहा VIDEO
Eknath Shinde : परभणीतील शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान माईक बंद पडला. माईक सुरू झाल्यानंतरही शिंदेंनी भाषण पुढे न नेता घोषणा देत भाषण आटोपतं घेतलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकनाथ शिंदे मनोज जरांगेंना मेळाव्यातून उत्तर देत होते,
माईक बंद पडला, काय घडलं? पाहा व्हिडीओ
Eknath Shinde, परभणी : परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिंदे यांचा माईक अचानक बंद पडला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर माईक सुरू झाला. मात्र त्यानंतर भाषण पुढे सुरू ठेवण्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी घोषणा देत भाषण आटोपतं घेतल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पाऊस मंदावला, पण 'या' विभागातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
मेळाव्याची गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती- शिंदे
या मेळाव्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, हा शेतकरी आणि युवकांचा मेळावा असून त्याची गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. कालपासून मराठवाड्यातील लोक या ठिकाणी आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी हा मेळावा स्थगित करण्यासाठी फोन केला होता, अशी माहिती बंडू जाधव यांनी दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं. यापूर्वी हा मेळावा एकदा रद्द झाला होता आणि आता तो होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा : लग्नानंतर सतत आजारी पडू लागला नवरदेव, महिन्याभरात बायकोवर संशय आला अन् घडलं भयंकर
