Maratha Reservation : ‘अरे असं करू नका रे’, CM एकनाथ शिंदे का झाले नाराज?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

chief minister eknath shinde disappointed on viral video of press conference
chief minister eknath shinde disappointed on viral video of press conference
social share
google news

Eknath shinde Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंची आंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितलं. याच वेळी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून खंत व्यक्त केली. एकनाथ शिंदे काय म्हणाले, तेच वाचा…

मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंनी 14 सप्टेंबर रोजी भेट घेतली. त्यांनी मराठा आरक्षण देणार, अशी ग्वाही दिली. आंदोलकांनी संवाद करत असतानाच शिंदेंनी व्हायरल झालेल्या व्हिडीओचा मुद्दा उपस्थित केला.

झालं असं की, मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला येत असताना तिघांमधील संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यात एकनाथ शिंदे, बोलूयात आणि निघून जाऊयात असं म्हणत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिंदेंनी काय दिलं स्पष्टीकरण…

“काल परवा पत्रकार परिषद झाली. त्यातलं बरोबर तुम्ही बुडखा शेंडा काढला आणि मधलं बरोबर दाखवलं. अरे असं करू नका. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. खरं म्हणजे हा विश्वासघात झाला. आम्ही काय बोलत येत होतो. आज आमची मीटिंग जेव्हा दीड वाजेपर्यंत झाली. त्या मीटिंगला येत होतो”, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

हेही वाचा >> Eknath Shinde: ‘आपण बोलून मोकळं व्हायचं ना…’, शिंदे-फडणवीसांचा ‘तो’ VIDEO का होतोय व्हायरल?

“देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरे नको. मी म्हणालो की, प्रश्नोत्तरे नको आणि राजकीय काहीही नको. जे मीटिंगमध्ये ठरलंय, तेवढंच बोलायचं आणि निघायचं. आता ह्यांनी मागचं काढलं… पाठचं काढलं आणि मधलंच धरलं. मी असा माणूस आहे का हो? की बाबा तुम्हाला फक्त आमिष दाखवायचं”, असं यावेळी शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Manoj Jarange Patil: ‘…तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन’, उपोषण सोडताच जरांगे-पाटलांचं तुफान भाषण

“मी तुम्हाला सांगतो की, एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री कधी होतो, तर प्रामाणिक असेल तर… नियत साफ असेल तर. माझ्या पोटात एक ओठात एक असं मी कधी आयुष्यात केलं नाही. करणारही नाही. जे आहे ते समोर”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT