'महाराष्ट्राचा कोहिनूर हरपला' मनोहर जोशींच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानंतर शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. यावेळी अनेक नेत्यांनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्राचा कोहिनूर हरपला

राजकीय वर्तुळातील जोशी सर हरपले
Manohar Joshi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिले व ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना 21 फेब्रुवारी रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटे 3.02 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर होते. बुलढाणा जिल्ह्यात त्यांचे नियोजित कार्यक्रम होते, मात्र मनोहर जोशींच्या निधन झाले समजताच ठाकरेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. 'शून्यातून विश्व निर्माण करणारे, कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन' अशा शब्दात त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही मनोहर जोशी यांच्या जुन्या आठवणी सांगत त्यांनी त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. कुटुंबीप्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले अशी शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.